एमआयएम नगरसेवकांची महापालिकेत झुंडशाही 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एमआयएमच्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा झुंडशाहीचे दर्शन घडविले. पाण्याच्या प्रश्‍नांवर आक्रमक झालेल्या सदस्यांनी सुरक्षारक्षकाला मारहाण करत खुर्च्यांची फेकाफेक करत शिवीगाळ केली. एक खुर्ची महापौर भगवान घडामोडे यांना लागल्यामुळे सभागृहात खळबळ उडाली, त्यामुळे गोंधळ घालणाऱ्या दोन नगरसेवकांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले. याप्रकरणी शासनाकडे अहवाल पाठविण्याचे महापौरांनी आदेशात नमूद केले आहे. 

महापौर भगवान घडामोडे यांचा कार्यकाळ 28 ऑक्‍टोबर रोजी संपणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेवटची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या वेळी पाण्याच्या प्रश्‍नांवरून जोरदार खडाजंगी झाली. ऐन सणासुदीमध्ये शहरात पाण्याची बोंब असल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. एमआयएमचे नगरसेवक वसुली कमी होण्यास प्रशासन जबाबदार आहे, नागरिकांचा काय दोष, असे म्हणत महापौरांच्या डायससमोर जमा झाले. काही जणांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. त्यात अपक्ष नगरसेवक सय्यद अजिम यांना सुरक्षारक्षकाचा धक्का लागला. त्यामुळे संतप्त अजिम यांनी सुरक्षारक्षक बापू जाधव यांना धक्काबुक्की केली. हा प्रकार सुरू असतानाच सय्यद मतीन व जफर बिल्डर हे जाधव यांच्या अंगावर धावून गेले. या धक्काबुक्कीमुळे महापौरांनी सभा तहकूब केली. महापौर दालनाकडे जात असताना जफर बिल्डर यांनी खुर्च्यांची फेकाफेक सुरू केली. त्यातील एक खुर्ची महापौरांच्या डोक्‍यावर पडली. तसेच, मतीन व जफर यांनी सभागृहात महिला सदस्य असताना अश्‍लील शिवीगाळ केली, त्यामुळे एकच खळबळ उडाली. 

Web Title: aurangabad news amc corporator