बोगस डॉक्‍टरविरुद्ध गुन्हा; महापालिकेचे कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

औरंगाबाद - वैद्यकीय शाखेची पदवी नसताना आयुर्वेदिक दवाखाना चालवून रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका बोगस डॉक्‍टरचा महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला होता. या बोगस डॉक्‍टरवर शुक्रवारी (ता.19) रात्री जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नोंद करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा भोंडवे यांनी एका कर्मचाऱ्याला साई आयुर्वेदिक औषधालयाची पाहणी करण्यासाठी पाठविले होते. या वेळी एकजण रुग्णांची तपासणी करताना उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डॉ. भोंडवे यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन साई आयुर्वेदिक औषधालयावर धाड टाकली. त्या वेळी आर. जी. आढाव (रा. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा) हा रुग्णांची तपासणी करताना आढळून आला. त्याच्याकडे वैद्यकीय शिक्षण घेतल्याच्या पदवीची विचारणा करण्यात आली असता पदवी दाखविली नाही. केवळ दुकान चालविण्याचा परवाना आढळून आला. डॉ. भोंडवे यांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर त्याला देता आले नाही. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या टाकळकर यांच्या आदेशानुसार क्‍लिनिकचा पंचनामा करण्यात आला व औषधी जप्त करण्यात आली. कारवाईचा अहवाल डॉ. मनीषा भोंडवे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्यानंतर आयुक्तांनी त्यांना बोगस 

डॉक्‍टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत प्राधिकृत केले. त्यानुसार जवाहरनगर पोलिस ठाण्यात बोगस डॉक्‍टर विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.

Web Title: aurangabad news amc Municipal corporation action on bogus doctor