आषाढीनिमित्त बाजार समितीत रताळी, बटाट्यांची बंपर आवक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

औरंगाबाद - आषाढी एकादशीनिमित्त औरंगाबाद बाजार समितीत सोमवारी (ता. तीन) बटाट्यांची १ हजार ९९, तर रताळींची ६५८ क्विंटल बंपर आवक झाली. मागील दोन दिवसांत शनिवारी (ता. एक) आणि रविवारी (ता. दोन) १७०० क्विंटलची आवक झाली होती. मागील तीन दिवसांत बाजार समितीत तीन हजार ४५७ क्विंटलची आवक झालेली आहे.

आषाढी एकादशीनिमित्त रताळी, बटाट्यांनी चारपट मागणी असते. त्यामुळे तीन दिवसांत बाजार समितीत आवक वाढली आहे. शनिवारी बटाट्यांची ७९९ क्विंटलची आवक झाली. याला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर सर्वसाधारण दर हा ६०० रुपये क्विंटल राहिला. रविवारी बटाट्यांची पाचशे क्विंटलची आवक झाली. बाजार समितीत शनिवारी २०५ क्विंटल रताळींची आवक झाली. याला १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. सर्वसाधारण दर हा १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. सोमवारी बटाट्यांची १ हजार ९९ क्विंटल आवक झाली. याला ६०० ते ६५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. रताळींची ६५८ क्विंटलची आवक झाली. याला १६०० ते २२०० रुपये क्विंटल दर मिळाला आहे.

Web Title: aurangabad news Ashadhi Ekadashi potato

टॅग्स