पासवर्ड हेरून चौदा जणांचे एटीएममधून हडपले पावणेसहा लाख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - एटीएम सेंटरवर रांगेत उभे राहून इतरांचा पासवर्ड हेरायचा, पैसे काढतेवेळी एक बटन स्वत:च दाबून ठेवत एटीएम खराब झाले, ट्रान्जॅक्‍शन रद्द झाले असे सांगून युजर्सला एटीएम सेंटरबाहेर पाठवायचे. त्यानंतर लगेचच ट्रान्जॅक्‍शन करायचे. यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. पण हा प्रकार खरा आहे. हरियाणाच्या ट्रकचालकाने अशा पद्धतीने चौदा एटीएम युजर्सना पावणेसहा लाखांचा गंडा घातल्याचे औरंगाबादमध्ये उघड झाले आहे. त्याला मंगळवारी (ता. एक) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मोहम्मद सलीम हाजीरखान (वय ३३) असे या भामट्याचे नाव असून तो हरियानाचा आहे. औरंगाबादेतील कचनेरनजीक खोडगाव येथे त्याची सासुरवाडी आहे. सासरी आल्यानंतर तो शहरातील मुकुंदवाडी भागातील एटीएम सेंटरवर ठाण मांडीत होता. तेथे पैसे काढण्यासाठी येणाऱ्यांवर तो लक्ष ठेवून असायचा. जास्त ज्ञान नसलेल्या एटीएम युजर्स एटीएम मशीनमध्ये कार्ड स्वॅप करुन पासवर्ड फिड करताना तो लक्ष ठेवून असायचा. पैशांच्या बटनावर प्रेस करताच हा भामटा मध्येच युजर्सना अडवायचा, तर दुसरे बोट मशीनवरील एका बटनावर प्रेस करून ठेवायाचा. यामुळे एटीएम मशीनची पूर्ण प्रक्रिया होण्याआधीच एटीएममध्ये पैसे नाहीत, ट्रान्जॅक्‍शन रद्द झाले अशी नानाविध कारणे सांगून युर्जसना एटीएम सेंटरबाहेर पाठवायचा. त्यानंतर क्‍लोनिंगसारखे तंत्रज्ञान वापरुन भामटा पैसे काढून पोबारा करायचा. अशाच पद्धतीने त्याने मुकुंदवाडी भागातील एटीएम सेंटरवर ठाण मांडले होते. त्याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे बारा हजारांची रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक राहुल खटावकर, फौजदार संजय बनसोडे, शेख अस्लम, कैलास काकडे, प्रकाश सोनवणे, विष्णू हगवणे यांनी केली.  

एसबीआयच्याच एटीएमवर गंडा
भामट्याने मुकुंदवाडी येथील भाजी मंडईत असलेल्या एटीएम केंद्रावरच नागरिकांना गंडवले आहे. विशेषत: सर्व एटीएम सेंटर भारतीय स्टेट बॅंकेची असून, चौदा प्रकरणांत त्याचा कारनामा उघड झाला. त्याने आणखी विविध ठिकाणी अशी मोड्‌स ऑपरेंडी वापरुन गंडवल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मानसिक खच्चीकरणाची शक्‍कल
अनेकवेळा एटीएममधून पैसे निघत नाहीत, अथवा ट्रान्जॅक्‍शनला विलंब झाल्यास भामटा युजर्सची सहनशक्ती संपावी म्हणून आणखी खच्चीकरण करायचा. त्यामुळे युजर्स पैसे निघत नसल्याने त्रस्त होऊन बाहेर गेले की, तो आपले इप्सित साध्य करायचा. तो कधी कधी ग्राहक असल्याचे भासवून एटीएम कार्डची अदलाबदल करीत होता. 

यांची झाली फसवणूक
राजेश चौधरी, स्वाती बोंदरे, संभाजी लहाने, बाबासाहेब ससाणे, बाबासाहेब साळवे, संजय भोकरे, प्रदीप मनोहर, बालाजी तोरकड, भरतसिंग पाटील, रामचंद्र तायडे, योगेश ठाकरे, सुनील भगोर, हर्षल आवळे यांना मोहम्मद सलीमने गंडवले. हे सर्वजण मुकुंदवाडी, रामनगर, सिडको एन-२ भागातीलच आहेत.

Web Title: aurangabad news atm crime