शहराचे अकरा डोळे बंद!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

औरंगाबाद - सेफ सिटीचे ११ कॅमेरे बंद पडले. दुसऱ्या टप्प्यातील कामे खोळंबली आणि आता निधीही मिळेना, अशा अडचणीत सापडलेल्या सेफ सिटी प्रकल्पाला घरघर लागली आहे. अठ्ठेचाळीस कॅमेऱ्यांपैकी अकरा कॅमेरे बंद आहेत. परिणामी या भागातील सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्थेला अडचणी येत आहेत. 

औरंगाबाद - सेफ सिटीचे ११ कॅमेरे बंद पडले. दुसऱ्या टप्प्यातील कामे खोळंबली आणि आता निधीही मिळेना, अशा अडचणीत सापडलेल्या सेफ सिटी प्रकल्पाला घरघर लागली आहे. अठ्ठेचाळीस कॅमेऱ्यांपैकी अकरा कॅमेरे बंद आहेत. परिणामी या भागातील सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्थेला अडचणी येत आहेत. 

सेफ सिटी प्रकल्प शहरात २०१५ पासून राबविण्यास सुरवात झाली. दोन टप्प्यांतील कामांपैकी जिल्हा नियोजन समितीकडून पहिल्या टप्प्यात निधी मिळाल्यानंतर कामेही पूर्ण झाली. त्यानंतर महापालिकेने सेफ सिटी प्रकल्पांतर्गत शहरात एकूण ४८ कॅमेरे बसविले आहेत. यानंतर तपासासाठी व सुरक्षेसाठी या कॅमेऱ्यांचा मोठा उपयोग पोलिस दलाला होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामे स्मार्ट सिटीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे उर्वरित कामांना विलंब लागत आहे. परिणामी सद्यःस्थितीत ४८ कॅमेऱ्यांवरच शहराच्या सुरक्षेची मदार आहे. विशेषत: यातही तब्बल अकरा कॅमेरे बंद आहेत. प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक समस्यांची माहिती, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना घरपोच दंडाच्या नोटिसीसाठीही या कॅमेऱ्यांची मोठी मदत मिळते. पण महापालिकेकडून लक्ष दिले जात नसल्याने या प्रकल्पाची दुर्दशा होण्याची वेळ आली आहे. 

कॅमेरे बंदचा परिणाम 
कॅमेरे बंद झाल्याचे हेरुन चोर, लुटारु मुद्दामहून बंद असलेल्या कॅमेऱ्याच्या ठिकाणी उघड गून्हे करीत आहेत. तसेच एका चालकाच्या रिक्षातच बॅग राहील्यानंतर कॅमेरे बंद असल्याची बाब पाहून त्यानेही बॅग परत केली नाही. उलट गहाळ झाली असावी असे सांगून मोकळे झाला. 

वर्षात बारा गुन्हे उघड 
२०१७ या वर्षात विविध प्रकारची गंभीर १२ गुन्हे सेफसीटीच्या कॅमेऱ्यांमुळे उघड करण्यात पोलिसांना यश आले. त्यातच आठ लाखांचे हरवलेले साहित्य, रोकडही नागरिकांना परत मिळवून देण्यात सेफसिटीच्या कॅमेऱ्यांचा वाटा मोठा आहे.

का बंद आहेत कॅमेरे?
निगा राखणाऱ्या कंत्राटदाराकडून चालढकल हा एक मुद्दा असून दुसरी बाब म्हणजे महापालिकेच्या एका ठेकेदारामुळे काही कॅमेरे बंद पडले आहेत. पथदिव्यांची कामे सुरू असताना ऑप्टिकल फायबर केबल तुटल्याने तीन दिवसांपासून कॅमेरे बंद आहेत. जोडणी करून द्या, अन्यथा गुन्हे नोंदवू, असे बजावल्यानंतर केबल जोडणीचे काम त्या कंत्राटदाराने सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: aurangabad news aurangabd city 11 cctv camera Off