औरंगजेबाचा राहता महाल पाहण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीमार्फत दर पंधरा दिवसांनी शहरातील वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तूंवर हेरिटेज वॉक आयोजित केला जातो. आतापर्यंत पाणचक्की, बीबी का मकबरा, हिमायत बाग, औरंगाबाद लेणी, सोनेरी महाल इथं हे कार्यक्रम झाले. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून यावेळी हा वॉक काहीशा दुर्लक्षित आणि अपरिचित अशा 'किले अर्क' भागात घेतला जाणार आहे.

औरंगाबाद : मुघल बादशहा औरंगजेबाचा राहता महाल पाहण्याची आणि त्याचा इतिहास समजून घेण्याची संधी औरंगाबादकरांना उद्या रविवारी (ता. तीन) मिळणार आहे. औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे आयोजित हेरिटेज वॉकला इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीमार्फत दर पंधरा दिवसांनी शहरातील वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तूंवर हेरिटेज वॉक आयोजित केला जातो. आतापर्यंत पाणचक्की, बीबी का मकबरा, हिमायत बाग, औरंगाबाद लेणी, सोनेरी महाल इथं हे कार्यक्रम झाले. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून यावेळी हा वॉक काहीशा दुर्लक्षित आणि अपरिचित अशा 'किले अर्क' भागात घेतला जाणार आहे. रविवारी (ता. तीन) सकाळी सातला सुभेदारी विश्रामगृहासमोरील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या आदिल गेट या प्रवेशद्वारापासून वॉक सुरु होईल. 

दख्खन काबीज करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाचा 'किले अर्क' हा राहता महाल होता. चोहीबाजूंनी बंदिस्त तटबंदीतून जागोजाग उभारलेले मर्दाना महाल, जनाना महाल, मोती मस्जिद, जनाना मस्जिद, कचेरी, पामेर कोठी, रंगबारी, तहखाने, तोफा लावलेले बुरुज, सुभेदारी, नहरी, कारंजी, बागबगीचे, असं सगळं काही शानदार स्थापत्य इथे होतं. सध्या भग्न अवस्थेत असलेल्या या महालाविषयी माहिती या वॉकमध्ये देण्यात येणार आहे. इतिहास तज्ज्ञ रफत कुरेशी आणि डॉ. दुलारी कुरेशी यांच्याकडून या भागाचा इतिहास जाणून घेता येणार आहे. इतिहासप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Aurangabad news Aurangajeb mahal

टॅग्स