...तर मुख्यमंत्री, नेत्यांचे विमान उडू देणार नाही- बच्चू कडू

अनिल जमधडे
शुक्रवार, 9 जून 2017

"शेतकऱ्यांना 50 टक्के नफा गृहीत धरून हमी भाव देणार," अशी घोषणा मोदी यांनी केली होती. पण पाळली नाही त्यामुळे त्यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारणार, पण तो उभा की आडवा, हे शेतकऱ्यांचे मत जाणून ठरवणार.

औरंगाबाद : "सरकार कलम कसाई आहे. एका निर्णयात लाखो शेतकऱ्यांना मारणारा निर्णय घेतात. 13 जूनला राज्यभर रेल रोको आहे, तरीही सरकारला जाग आली नाही तर मुख्यमंत्री, नेत्याचे विमान उडू देणार नाही," असा इशारा बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

"साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याला चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. शेतकऱ्यांनी पीक बदलून पहिले, शेतीची पद्धत बदलली, पक्ष अन् नेतेही बदलून पहिले. लूट काही थांबत नाही, याला चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. शेतकऱ्यांची वर्गवारी करा, अल्पभूधारक मधील अल्प शब्द काढा, कर्मचारी, अधिकारी आणि नेत्यांना कर्जमाफीतून वागळण्यास हरकत नाही. पण जमीन किती त्यावर कर्जमाफी ठरवू नका. शेतकरी लढाई निर्णयक टप्प्यात आहे." 

"आंदोलनाने देश स्वतंत्र झाला, शेतकऱ्यांना न्याय मिळेल, मुख्यमंत्री यांनी डोक्यातून भाजप काढला तर ते 15 मिनिटात निर्णय घेऊ शकतात. शेतकऱ्यांना 50 टक्के नफा गृहीत धरून हमी भाव देणार," अशी घोषणा मोदी यांनी केली होती. पण पाळली नाही त्यामुळे त्यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारणार, पण तो उभा की आडवा, हे शेतकऱ्यांचे मत जाणून ठरवणार.

 

Web Title: aurangabad news bachchu kadu intimates to stop CM Fadnavis flights