उपमहापौरपदासाठी भाजपमध्ये चुरस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - महापौरपदासाठी युतीचा निर्णय झाल्यानंतर आता उपमहापौरपदासाठी भाजपमध्ये चुरस निर्माण झाली असून, सोमवारी (ता. २३) महापौर बंगल्यावर भाजप कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली; मात्र या बैठकीत नावावर एकमत झाले नसल्याने मंगळवारी (ता. २४) प्रदेश कार्यकारिणीकडून नाव घोषित होण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महापौर, उपमहापौरपदासाठी रविवारी (ता.२९) निवडणूक घेण्यात येणार आहे. शिवसेनेने अनुभवी नगरसेवक नंदकुमार घोडेले यांना महापौरपदासाठी उमेदवारी  दिली आहे; मात्र सुरवातीला स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपने रविवारी (ता. २२) युतीचा निर्णय घेतला. असे असले तरी अद्याप उपमहापौरपदासाठी नाव जाहीर केलेले नाही. ज्येष्ठ नगरसेवक राजू शिंदे, नितीन चित्ते, राजगौरव वानखेडे, ॲड. माधुरी अदवंत यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. नाव अंतिम करण्यासाठी भाजप कोअर कमिटीची सोमवारी बैठक घेण्यात आली. त्यात नावावर एकमत झाले नाही. त्यामुळे मंगळवारी पुन्हा कोअर कमिटीची बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, प्रदेश कार्यकारिणीकडूनदेखील नावाची घोषणा होऊ शकते. २६ ऑक्‍टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे भाजपला मंगळवारी उमेदवार घोषित करावाच लागणार आहे.

प्रभावी उमेदवाराचा शोध  
शिवसेनेने महापौरपदासाठी अनुभवी असलेले श्री. घोडेले यांची निवड केली आहे. त्यांचा हातखंडा पाहता उपमहापौरपदासाठी प्रभावी उमेदवार पक्षाने द्यावा, अनुभव नसलेल्या नवख्या नगरसेवकाची उपमहापौरपदी वर्णी लागल्यास महापालिकेत फटका बसू शकतो, असे भाजपमधील काही जणांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रभावी उमेदवाराचा शोध भाजपतर्फे घेतला जात आहे.

Web Title: aurangabad news bjp amc