भाजपमध्ये कोणालाही प्रवेश मिळतो - हरिभाऊ बागडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

औरंगाबाद - 'मुलींसाठी मुलगा पाहायला जाताना जेवढी चौकशी केली जायची, तितकीच चौकशी पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांची होते; मात्र आज पक्षात ज्यांच्यावर खुनाचा गुन्हा आहे आणि जो वेडा आहे या दोन प्रकारच्या व्यक्‍ती सोडल्या तर प्रत्येकाला प्रवेश दिला जातो,'' अशा तीव्र शब्दांत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्‌घाटन विधानसभाध्यक्ष बागडे यांच्या हस्ते झाले. माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग बनकर आदी उपस्थित होते.

बागडे म्हणाले, की अटलबिहारी वाजपेयी हे बराच काळ म्हणजे आणीबाणीच्या काळापर्यंत जनसंघाचे अध्यक्ष होते. जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षात काम करत असताना कार्यकर्त्यांची निवड ही काटेकोरपणे आणि सर्व बाबी तपासून केली जायची. आज परिस्थिती वेगळी आहे. समाज बदलला आहे, त्यानुसार पक्षही बदलला. आता पक्षात कुणालाही घेतले जाते. वेडा आणि खुनी अशा दोन प्रकारच्या व्यक्ती सोडल्या तर सगळ्यांनाच पक्षात प्रवेश दिला जातो, असा जोरदार टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

Web Title: aurangabad news In BJP anyone gets admission