औरंगाबाद बाजार समिती भाजपच्या ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - औरंगाबाद बाजार समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. राधाकिशन पठाडे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार राहुल सावंत यांचा 13 विरुद्ध 4 मतांनी पराभव करीत सभापतिपद मिळविले. 

बाजार समितीचे तत्कालीन सभापती संजय औताडे यांच्याविरुद्ध 11 ऑगस्टला भाजपच्या 12 संचालकांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. हा ठराव 22 ऑगस्टला मंजूर झाला. यानंतर सभापतिपदासाठी ही निवडणूक झाली. यामध्ये पठाडे यांना 13, तर सावंत यांना चार मते मिळाली. सभापतिपदाच्या निवडीमुळे गेल्या 21 दिवसांपासून बाजार समितीचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते.

Web Title: aurangabad news bjp Bazar Samiti