महापौर, उपमहापौरपदासाठी युतीचे उमेदवार आज भरणार अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - महापौर, उपमहापौरपदासाठी बुधवारी (ता. 25) शिवसेना-भाजपचे उमेदवार प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्याची गुरुवारी (ता.26) अंतिम मुदत आहे. 

महापौरपदासाठी शिवसेनेने अनुभवी नगरसेवक नंदकुमार घोडेले यांना उमेदवारी दिली असून, उपमहापौरपदाचा भाजपचा उमेदवार मंगळवारी (ता.24) रात्री उशिरापर्यंत निश्‍चित झाला नसला तरी बुधवारी सकाळपर्यंत नाव अंतिम होणार आहे. त्यानुसार सकाळी दहा वाजता महापालिकेत अर्ज भरण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. 

नगरसेवक जाणार सहलीवर  
अर्ज भरल्यानंतर शिवसेना-भाजपचे नगरसेवक सहलीवर जाणार आहेत. ते 29 ऑक्‍टोबरला सकाळी शहरात दाखल होतील. शिवसेनेने यापूर्वीच काही अपक्ष नगरसेवकांना सहलीवर पाठविले आहे. 

अन्य पक्षांत सामसूम  
महापालिकेत एमआयएमचे 24 नगरसेवक असून, विरोधी पक्षनेतेपद याच पक्षाकडे आहे; मात्र अद्याप एमआयएमचे उमेदवारही निश्‍चित झालेले नाहीत. कॉंग्रेसचीदेखील तीच अवस्था आहे. युती झाल्यामुळे आमचे उमेदवार केवळ नावापुरतेच आहेत, अशी प्रतिक्रिया या पक्षाचे नेते देत आहेत.

Web Title: aurangabad news bjp shiv sena amc