नवा बायपास वाहणार पन्नास हजार वाहनांचा भार

सोमवार, 7 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - सोलापूर, नांदेड, विदर्भाकडून औरंगाबादमार्गे येणाऱ्या आणि पुणे-मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा भार वाहण्यासाठी औरंगाबाद शहरालगत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) नव्या बायपासची उभारणी करण्यात येणार आहे. ३०.१२५ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर दोन उड्डाणपूल आणि सात ठिकाणी बस बे ही उभारण्यात येतील. 

वाहनांना वेग मिळण्यासाठी औरंगाबादलगतच्या बायपासला धुळे - सोलापुर महामार्ग असताना या रस्त्याला स्वतंत्र स्थान देण्यात आले आहे. 

या कामाच्या निविदा आता निघणार असून शहरात येणाऱ्या सुमारे ५० हजार लहान-मोठ्या वाहनांचा भार वाहण्यासाठी हा महामार्ग बांधला जाणार आहे. या डिझाईनिंगनंतर ३०.१२५ किलोमीटर लांबीचा हा बायपास निपाणी येथून सुरु होत गांधेली, देवळाई फाटा, पैठण रोड (जंक्‍शन), एएस क्‍लब (जंक्‍शन), भांगसी माता (जंक्‍शन) मार्गे करोडी येथे जाणार आहे. 

या रस्त्यासाठी करोडी येथे नियोजित टोल प्लाझा उभारण्यात येणार आहे. तीस किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर दोन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. औरंगाबाद - पैठण, पुणे महामार्गावर हे पूल राहतील. या रस्त्यावरुन दिवसाकाठी सुमारे ५० हजार वाहनांची ये-जा होईल, असा एनएचएआयचा अंदाज आहे.

बायपास एका दृष्टिक्षेपात...
एकूण लांबी ३०.१२५ किमी.
रस्त्याची रुंदी - ६० मीटर
दोन मीटरचा शोल्डर, दीड मीटरचा फुटपाथ
मोठे पूल - १, लहान पूल - १९, 
अंडरपास - ८, उड्डाणपूल - २, 
टोल प्लाझा - १
किंमत - ६५१ कोटी 
ट्रक बे, पादचाऱ्यांची सुविधा. 
पादचाऱ्यांसाठी पेडेस्ट्रियन गार्ड 
(जाळी)
करोडी गावाजवळ हायमास्ट
सर्व्हिस/स्लीप रोड - ७.८५ किमी. 
सर्व्हिस रोडला दीड मीटरचा मातीचा शोल्डर
पाण्याचा निचरा करण्यासाठी २ मीटर ड्रेन, युटिलिटी कॉरिडॉर
सात गावांत १४ बस थांबे
मोठ्या पुलांवर १५० मीटर क्रॅश बॅरियर (दोन्ही बाजू)
लहान पुलांवर ५० मीटर (दोन्ही बाजू)
जंक्‍शनच्या (दोन रस्ते एकत्र) ठिकाणी एलईडी लाईट (बिकॉन) 
गावकऱ्यांसाठी बसथांब्याला जोडणाऱ्या ठिकाणी रेलिंग
अडीच मीटर रुंद दुभाजकावर झाडे
गरजेनुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे
गस्त, रुग्णवाहिका आणि क्रेन सुविधा
बस बे - निपाणी, गांधेली, देवळाई, रा. रा. पोलिस कॉलनी, पैठण रस्ता, एएस क्‍लब जंक्‍शन, भांगसीमाता गड परिसर.
अंडरपास - निपाणी, आडगाव, देवळाई, सातारा तांडा गाव,
पैठण लिंक रोड, शिर्डी रोड. 

Web Title: aurangabad news Bypass