औरंगाबादेत मंत्रिमंडळ बैठकीसाठी हालचाली, पूर्वतयारीसाठी प्रस्ताव मागवले

राजेभाऊ मोगल 
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

औरंगाबाद : मराठवाड्यातील प्रश्‍नांबाबत चर्चा करून त्यावर महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी संभाव्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. यासंबंधी विविध विभागाकडून 1 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले आहेत. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर सर्व विभागांचा आढावा घेण्यात येणार आहे. 

राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत मराठवाड्याचा देखील विकास व्हावा, यासाठी येथील अनुशेष दूर करण्यासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठक घेतली जात असे. मात्र, 2009 नंतर चक्‍क आठ वर्षाच्या कालावधीनंतर गतवर्षी 4 ऑक्‍टोबर 2016 रोजी बैठक झाली. त्यानंतर यावर्षी देखील बैठक घेण्याबाबत हालचाली सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत. या संभाव्य बैठकीसाठी प्रशासनाकडून त्या - त्या विभागातील प्रमुखांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

या पत्रानुसार 1 सप्टेंबरपर्यंत आपापल्या विभागातील मागण्या, प्रस्ताव कळवायच्या आहेत. या मागण्यांचे प्रस्ताव आल्यानंतर विविध विभागांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगीतले. दरम्यान, येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्‍तीसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन होत असते. या कार्यक्रमानंतर विविध प्रश्‍नांचा, मागण्यांचा आढावा घेत संभाव्य मंत्रीमंडळ बैठकीबाबत निर्णय होईल, अशी शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे.

Web Title: aurangabad news cabinet meeting preparation