कारने दुचाकीस्वाराला उडविले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

औरंगाबाद - दुचाकी नादुरुस्त झाल्याने ढकलत नेताना मागून भरधाव आलेल्या कारने धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी ढकलत नेणारा तरुण जागीच ठार झाला. ही घटना बीडबायपास रस्त्यावरील एमआयटी ते महानुभाव चौकादरम्यान एका हॉटेलजवळ सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली. या अपघातात कारचालकही जखमी झाला.

औरंगाबाद - दुचाकी नादुरुस्त झाल्याने ढकलत नेताना मागून भरधाव आलेल्या कारने धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी ढकलत नेणारा तरुण जागीच ठार झाला. ही घटना बीडबायपास रस्त्यावरील एमआयटी ते महानुभाव चौकादरम्यान एका हॉटेलजवळ सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली. या अपघातात कारचालकही जखमी झाला.

सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ संजय थोरात (वय  १९, रा. कांचनवाडी) असे मृताचे नाव आहे. बीडबायपास रस्त्याने जाताना त्याची दुचाकी नादुरुस्त झाली. त्यामुळे तरुण दुचाकी ढकलत एमआयटीकडून महानुभाव चौकमार्गे पैठणकडे जाणाऱ्या रस्त्याने कांचनवाडीला जात होता. याच दरम्यान महानुभाव चौकाकडे भरधाव वेगात कार (एमएच- ४८,  ए. सी.  ८९३५) जात होती. पुढे दुचाकी घेऊन तरुण पायी जात असल्याची बाब कारचालकाला उशिरा लक्षात आली. अचानक दुचाकी व तरुण समोर पाहून चालकाने कार नियंत्रणात आणायचा प्रयत्न केला; परंतु कारची गती एवढी जास्त होती की दुचाकीसह तरुणाला जोरात कार धडकली. यात तरुण जागीच ठार झाला. 

या घटनेनंतर चालक व आतील काहीजण पसार झाले. अपघाताची बाब समजताच घटनास्थळी परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी अपघाताची माहिती सातारा पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस पोचले. त्यांनी कार ताब्यात घेतली असून या घटनेची नोंद सातारा ठाण्यात झाली.

वाहनांचा चुराडा
अपघात एवढा भीषण होता की, तरुण काही अंतर उंच उडून डोक्‍यावर पडला. त्यात मोठा रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. अपघातादरम्यान कार व दुचाकी रस्त्यालगत एका दुकानाच्या शटरला धडकल्याने दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झाला.

चालकावर खासगी रुग्णालयात उपचार 
अपघातानंतर कारचालकही गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सातारा ठाण्याचे उपनिरीक्षक डोईफोडे यांनी दिली.

Web Title: aurangabad news car accident