साप पकडण्यासाठी  बनवला सुरक्षित चिमटा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

औरंगाबाद - साप पकडण्यासाठी सर्पमित्र नितेश जाधव यांनी शक्कल लढवून सुरक्षित ‘स्नेक कॅचर’ तयार केला आहे. यामुळे सापाला कुठलीही इजा न होता त्यांना सुरक्षित पकडले जाऊ शकते, असा त्यांचा दावा आहे.

औरंगाबाद - साप पकडण्यासाठी सर्पमित्र नितेश जाधव यांनी शक्कल लढवून सुरक्षित ‘स्नेक कॅचर’ तयार केला आहे. यामुळे सापाला कुठलीही इजा न होता त्यांना सुरक्षित पकडले जाऊ शकते, असा त्यांचा दावा आहे.

बाजारात उपलब्ध स्नेक कॅचरमुळे सापाचा मणका फ्रॅक्‍चर होऊन तो जखमी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत एका कंत्राटदाराकडे काम करणारे सर्पमित्र नितेश जाधव यांनी सापांसाठी आणि सर्पमित्रांसाठीही सुरक्षित असा स्नेक कॅचर तयार केला आहे. वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक, उपवनसंरक्षक सतीश वडसकर आणि वन अधिकारी श्री. तांबे यांनी या उपकरणाची तपासणी केली. साप सुरक्षितपणे पकडला जातो, अशी खात्री पटल्यानंतर त्यांनी मान्यता देत जाधव यांना साप पकडण्याचा परवानाही दिला. 

Web Title: aurangabad news catching a snake made secure clip