'जालना रस्त्याच्या कामात आता दिरंगाई नको'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

औरंगाबाद - शहराची लाइफलाइन असलेल्या जालना रस्ता आणि बीड बायपासच्या कामांत आता दिरंगाई न करता त्यांची निविदा प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली. या रस्त्यांच्या निधीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) कात्री लावल्याचे माहिती अधिकारातून समोर आले होते. 

औरंगाबादेतील जालना रस्ता आणि बीड बायपास या रस्त्यांचे जुने प्रकल्प असताना नवे प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहेत. यामुळे शहरातील या दोन रस्त्यांवर 750 कोटी खर्च करण्याची घोषणा केली गेली असताना शहरातील अन्य सगळ्या रस्त्यांसह या कामाला केवळ 500 कोटींमध्ये गुंडाळण्यात येत आहे. मंत्र्यांची घोषणा असताना गुपचूप लावलेली ही कात्री "सकाळ'ने उजेडात आणली होती. त्याची दखल घेत खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत डीपीआर तयार असल्याने या रस्त्यांच्या कामांना अधिक दिरंगाई न करता त्यांची निविदा प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी केली. ही कामे होत नसल्याने आता नागरिक प्रश्‍न विचारत असून माध्यमांमधून टीका होत असल्याचे श्री. गडकरी यांना दिलेल्या पत्रात श्री. खैरे यांनी नमूद केले आहे. 

घोषणांना परस्पर कात्री लावू नका 
मंत्री म्हणून आपण केलेल्या घोषणांमध्ये कोणत्याही स्वरूपाची कपात करण्यात येऊ नये, असे आदेश यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक कुमार यांना नितीन गडकरी यांनी दिले. आपण औरंगाबादेत घेतलेल्या बैठकांची विस्तृत माहिती नितीन गडकरी यांना दिली असल्याचे खासदार खैरे यांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

Web Title: aurangabad news Chandrakant Khaire jalna road