राज्यकर्तेच पुतळ्यांच्या विटंबनेला जबाबदारः चंद्रकांत खैरे

राज्यकर्तेच पुतळ्यांच्या विटंबनेला जबाबदारः चंद्रकांत खैरे
राज्यकर्तेच पुतळ्यांच्या विटंबनेला जबाबदारः चंद्रकांत खैरे

औरंगाबाद: लेनिनचा पुतळा पाडल्यामुळे पुतळा विटंबनेच्या घटना देशभर घडत आहे. शिवसेना त्याचा तीव्र निषेध करते. या घटनांना राज्यकर्तेच जबाबदार असल्याचे सांगत राज्य आलं म्हणून मागच्या राज्यकर्त्यांनी उभारलेले महापुरुषांचे पुतळे पाडणे योग्य नाही, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपला लगावला. अशा घटना पुन्हा शहरात घडू नये यासाठी महापालिका आयुक्तांना सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना करत पोलिसांच्या सेफ सिटी प्रकल्पाचे वाभाडे शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी काढले.

आज (शनिवार) सकाळी सात वाजेच्या सुमारास समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला डांबर व काळा ऑईलपेंट फासल्याची घटना उघड झाली. गोपाल कुलकर्णी यांना माहीत पडताच त्यांनी पोलिसांसह या भागातील माजी नगरसेवक समीर राजूरकर, महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेवक ऋषिकेश खैरे, खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट यांच्यासह जबाबदार नागरिकांना कळवली. सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अग्निशामक दलाच्या बंबाचे पाचारण केले. त्यानंतर पुतळ्याची साफसफाई करण्यात आली. डांबर काढल्यानंतर पुतळ्याची डागडुजी करण्यात आली. त्यानंतर सावरकर प्रेमी मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुतळ्याभोवती फुलांची सजावट करून पुतळ्याचे पूजन करण्यात आली. दरम्यान, साडे नऊ वाजेच्या सुमारास सावरकर चौकात आजी माजी आमदार व नागरसेवकांसह सावरकर प्रेमी मित्रमंडळीने रस्ता रोको करण्यात आले. पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे,एसीपी गोवर्धन कोळेकर, निरीक्षक परोपकारी यांना समाजकंटकांना अटक करून कडक शासन करण्याचे निवेदन देण्यात आले. बजरंग दल, विश्वहिंदू परिषद, शिवसेना भाजपा च्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा निषेध केला.

दोषींवर करवाई करू : पोलीस उपायुक्त ढाकणे
समर्थनगर येथील पुतळ्याची विटंबना व ब्राह्मणवाद विरोधी पत्रक भिरकवणाऱ्या समाजकंटकांचा शोध पोलीस घेत आहे. सकाळी चार वाजता गुड मॉर्निग पथक राउंड घेऊन गेले तेव्हा यावेळी काहीही प्रकार निदर्शनास आला नाही. त्यानंतर ही घटना घडली असण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला असून यात गुडमॉर्निंग पथक दिवशी असल्यास त्यांच्यावर करवाईचा इशाराही त्यांनी दिला.

दत्तक पुतळे योजना राबवणार
भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून पोलीस शहाराती पुतळे पोलीस कामाचाऱ्यांना दत्तक देणार आहे त्याकडे देखभाल व सुरक्षेची जबाबदारी त्या कर्मचाऱ्यांची राहणार आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. सेफ सिटीतून बसवण्यात आलेला सावरकर चौकातील सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांचया सेफ सिटी प्रकल्पावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सीसीटीव्ही लवकरच सुरू करू असेही पोलिसांकडून सांगण्यात आले

पुन्हा असे प्रकार नको महापालिकेची जबाबदारी
कचरा प्रश्नाचे कारण सांगू नका. शहरातील पुतळेही महापालिकेची जबाबदारी आहे. शहरातील सर्व पुतळ्यांच्या सुरक्षेच्या तत्काळ उपाययोजना करा.सीसीटीव्ही बसवा. सुरक्षा रक्षक नेमा. महापुरुषांचा अवमान होता कामा नये अशी ताकीद शिवसेना नेते खासदार खैरे यांनी महापालिका आयुक्त डी एम मुंगळीकर यांना दिली. पोलिसांनी समाजकंटकाना पकडून त्यांचे हात-पाय तुडवा असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com