राज्यातील नादुरुस्त मीटर महिनाभरात बदला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

औरंगाबाद - राज्यातील सिंगल फेजचे सुमारे 10 लाख 37 हजार नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत व हे मीटर बदलताना त्याची जागेवरच क्रमांकासह मोबाईल ऍपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्यात यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत. 

महावितरणच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई मुख्यालयात बैठक झाली. यात संजीव कुमार म्हणाले, की विभागीय कार्यालयांना पुरेसे नवीन वीजमीटर उपलब्ध करून दिले आहेत. सिंगल फेजचे आणखी 30 लाख नवीन वीजमीटर उपलब्ध होतील. त्यामुळे नादुरुस्त आढळलेले वीजमीटर महिन्यात बदलावेत. त्यानंतर एकही नादुरुस्त सिंगल फेज वीजमीटर ग्राहकांकडे राहणार नाहीत, याप्रमाणे कार्यवाही करावी. 

महावितरणकडून मीटर रीडिंग मोबाईल ऍपद्वारे सुरू असल्याने बिलिंग प्रणालीत पारदर्शकता व गतिमानता आली. मात्र मीटर रीडिंग एजन्सीजकडून अद्यापही सदोष रीडिंगचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्रास होत आहे. त्याचप्रमाणे महावितरणचेही नुकसान होते. त्यामुळे बिलिंगमध्ये अचूकता आणण्यासाठी विभागीय कार्यालयांनी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

नादुरुस्त मीटरची विभानिहाय संख्या 
- औरंगाबाद - 1 लाख 85 हजार 
- नागपूर - 2 लाख 
- कोकण - 4 लाख 53 हजार 
- पुणे - 1 लाख 98 हजार 

Web Title: aurangabad news Change in the state's rough meter