बॅंकांच्या मोफत सेवांनाही आता चार्जेस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

औरंगाबाद - बॅंकातर्फे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या मोफत सेवा आता सशुल्क होणार आहेत. नव्या वर्षांच्या शेवटच्या आठवड्यापासून हा निर्णय होण्याची शक्‍यता बॅंक अधिकाऱ्यांतर्फे वर्तविण्यात येत आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना आता मोफत सेवेलाही शुल्क द्यावे लागणार आहे. सर्वच राष्ट्रीयीकृत बॅंकांचा यात समावेश असणार आहे. 

सर्व सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बॅंकेच्या शाखांमध्ये मिळणाऱ्या मोफत सेवांसाठी पैसे मोजावे लागणार आहे. या सुविधांमध्ये पैसे काढणे, जमा करणे, मोबाईल नंबर बदलणे, केवायसी, पत्ता बदलणे, नेट बॅंकिंग आणि चेकबुकसाठी अर्ज करण्याच्या सुविधेसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाण्याची शक्‍यता आहे. आपले खाते असलेल्या बॅंकेच्या शाखा व्यतिरिक्त दुसऱ्या शाखेतील सेवेसाठी वेगळे शुल्क द्यावे लागणार आहे. या शुल्कासोबतच जीएसटीही द्यावे लागणार आहे. यासाठी बॅंक तुमच्याकडून वेगळे पैसे घेणार नाही तर, तुमच्याच बॅंक अकाउंटमधून पैसे कापण्यात येतील. देशभरातील सर्वच ग्राहकांना हे चार्जेस द्यावे लागणार असल्याचेही बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सध्या बॅंकांतर्फे विविध सेवांसाठी शुल्क आकारते. या सेवांमध्ये एटीएम व्यवहार शुल्क, लेट फी चार्ज, डिमांड ड्राफ्ट चार्ज आणि अन्य शुल्कांचा समावेश होतो. सुविधांच्या बदल्यात द्याव्या लागणाऱ्या शुल्कावर जीएसटीही आकारण्यात येणार आहे. हा जीएसटी १८ टक्के असण्याची शक्‍यता आहे.

नव्याने शुल्क लागू झाल्यास रक्कम जमा करताना किंवा अन्य सेवांचा वापर करताना अतिरिक्त शुल्क आकारण्यात येण्याची शक्‍यता आहे. मात्र, ही रक्कम सेवेचा वापर करताना वसूल करण्याऐवजी संबंधितांच्या बॅंक खात्यातून परस्पर वळविण्यात येणार आहे. सध्या बॅंका ग्राहकांकडून एटीएम व्यवहार शुल्क, रक्कम हस्तांतर, लेट फी चार्ज, डिमांड ड्राफ्ट चार्ज आदींसाठी शुल्क अदा करतात.

Web Title: aurangabad news Charges for free services of banks are now available