शहर बसचा मुहूर्त हुकला! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

औरंगाबाद - स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची गुरुवारी (ता. १८) होणारी बैठक लांबणीवर पडली आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारीला शहर बस सुरू करण्याचा मुहूर्त लांबणीवर पडणार आहे. 

औरंगाबाद स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा राज्याच्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांना वेळ नसल्यामुळे ही बैठक लांबणीवर गेली आहे. 

आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले, की १८ जानेवारीला स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक होणार होती; मात्र श्री. पोरवाल यांनी बैठकीसाठी वेळ नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे पाच बस खेदीची प्रक्रियादेखील लांबणीवर पडणार आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांची २३ जानेवारीला शहर बससेवा सुरू करण्यासाठी धडपड सुरू होती; पण बस खरेदी कशा करायच्या यावरून बराच खल झाला. निविदा काढण्याच्या सूचना तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या होत्या. त्यानंतर श्री. मुगळीकर यांनी शासनाच्या वेब पोर्टलवर याबाबतची तरतूद आहे का? याची तपासणी केली. 

आता महिनाअखेर निर्णय
दिल्ली, भोपाळ, इंदूर शहरात इलेक्‍ट्रिक बस यशस्वी ठरल्या आहेत. याच धर्तीवर शहरात इलेक्‍ट्रिक बस सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बस खरेदीसंदर्भात आता ३१ तारखेच्या बैठकीतच निर्णय होईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील ३५ बस खरेदी करण्याची निविदा काढली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: aurangabad news city bus