कंत्राटदारामार्फत शहर बसची अाशा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

औरंगाबाद - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारीला शहर बस सेवा सुरू करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांवर स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक लांबणीवर पडल्यामुळे पाणी फेरले गेले होते. मात्र, महापौरांनी अद्याप आशा सोडलेली नाही. तात्पुरत्या स्वरूपात पाच शहर बस खासगी कंत्राटदारामार्फत सुरू करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आधी पाच इलेक्ट्रीक बस निविदा काढून खरेदी करायच्या की शासनाच्या वेब पोर्टलवर असलेल्या कंत्राटदारांकडून याबाबत बराच खल करण्यात आला.

थेट बस खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव गुरुवारी (ता.१८) होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्यात येणार होता. मात्र, बैठकच लांबणीवर पडल्यामुळे शहर बसचा देखील मुहूर्त हुकला आहे. मात्र महापौर घोडेले यांनी अद्याप आशा सोडलेली नाही. त्यांनी बुधवारी (ता.१७) खासगी कंत्राटदारामार्फत बस सेवा सुरू करता येईल का, याची चाचपणी केली. एसटीच्या अधिकाऱ्यांसोबतदेखील चर्चा केली. मात्र, बससेवा सुरू करण्यापूर्वी महामंडळाची परवानगी तसेच आरटीओ कार्यालयाकडून तिकिटांच्या दरांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी देखील महापौरांनी चर्चा केली.

Web Title: aurangabad news city bus