पिके, तंत्रज्ञान आणि फवारणीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करा

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 17 मे 2018

औरंगाबाद - लागवडीयोग्य पिके, आवश्‍यक तंत्रज्ञान, औषध फवारणी, पिकांसाठी घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी, अशा सूचना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय सहसचिव अश्विनी कुमार यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी (ता. 16) येथे केल्या. 

औरंगाबाद - लागवडीयोग्य पिके, आवश्‍यक तंत्रज्ञान, औषध फवारणी, पिकांसाठी घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी, अशा सूचना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय सहसचिव अश्विनी कुमार यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी (ता. 16) येथे केल्या. 

औरंगाबाद तालुक्‍यातील गाढे जळगाव, शेकटा; फुलंब्री तालुक्‍यातील डोंगरगाव कवाड आणि पाथरी येथील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना ते बोलत होते. राज्य कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी मंजूषा मुथा, सोमनाथ जाधव, तहसीलदार सतीश सोनी, संगीता चव्हाण, पथकातील नंदिनी गोकटे नारखेडकर, आर. डी. देशपांडे, के. डब्ल्यू. देशकर, चाहत सिंग, एम. जी. टेंभुर्णे, ए. मुरलीधरन, डॉ. डी. के. श्रीवासन उपस्थित होते. 

गाढे जळगाव येथे शेतकरी जाबेर सय्यद, उपसरपंच अब्दुल रहीम पठाण यांच्याशी संवाद साधून बोंडअळीने झालेल्या नुकसानीबाबत केंद्रीय पथकाने त्यांच्याशी चर्चा केली. तसेच तुकाराम मारोती ठोंबरे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यानंतर शेकटा येथे दत्तात्रय जाधव, मनोज वाघ, युनूस भाई यांच्याशीही पथकाने कापूस लागवड, पेरा, बोंडअळी, वेचणी, उत्पादन, फवारणी याबाबत आलेल्या अडचणी याविषयी संवाद साधला. 

तसेच फुलंब्री तालुक्‍यातील डोंगरगाव कवाड येथील मंदिरात भीमराव एकनाथ भोपळे, उत्तम भोपळे, भास्कर डकले यांच्याशीही चर्चा केली. 

पाथ्री येथे दत्ताभाऊ पाथरीकर, दगडू बंडू बन्सोड, शिवाजी पाथ्रीकर, राजू तुपे, साहेबराव खाकरे, ग्रामस्थ यांच्याशीही मुक्तसंवाद साधताना अश्विनी कुमार यांनी पऱ्हाटीची तत्काळ विल्हेवाट लावावी, असे आवाहन केले. प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या डॉ. पी. आर. झंवर यांनी गुलाबी बोंडअळीवर सादरीकरण केले.

Web Title: aurangabad news Create awareness among farmers about crops, technology and spraying