अठरा वर्षीय मुलीला घेऊन विवाहित महिलेचे पलायन! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

औरंगाबाद - पंचवीस वर्षांच्या विवाहितेने दुसऱ्या कुटुंबातील अठरा वर्षीय मुलीसह पलायन केले. ही बाब समजल्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन त्यांना पूर्णा येथून ताब्यात घेतले. यातील मुलीला पोलिसांनी कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. पण या दोघींनी पलायन का केले, याचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

औरंगाबाद - पंचवीस वर्षांच्या विवाहितेने दुसऱ्या कुटुंबातील अठरा वर्षीय मुलीसह पलायन केले. ही बाब समजल्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन त्यांना पूर्णा येथून ताब्यात घेतले. यातील मुलीला पोलिसांनी कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. पण या दोघींनी पलायन का केले, याचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा परिसरात एक पंचवीस वर्षीय विवाहिता पतीपासून दोन वर्षांपासून वेगळी राहते. तिला चार वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्याकडे भाड्याने एक कुटुंब राहत होते. या कुटुंबातील अठरा वर्षीय मुलीशी विवाहितेची मैत्री झाली; परंतु यादरम्यान मुलीचे कुटुंबीय इतर ठिकाणी राहण्यास गेले. यानंतर सोमवारी (ता. 26) रात्री नऊच्या सुमारास अठरा वर्षीय मुलगी दुकानावर साहित्य खरेदीसाठी गेली. त्यानंतर ती व विवाहित महिला बेपत्ता झाल्या. मुलीच्या वडिलांनी तिचा शोध घेतला असता विवाहिताही घरी नसल्याचे समजले. त्यांनी यानंतर सातारा ठाण्यात धाव घेत विवाहितेने पळवून नेल्याची तक्रार दिली. यात अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर पोलिसांनी दोघींचा शोध सुरू केला. दोघी पूर्णा येथील रेल्वेस्थानकावर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सातारा पोलिसांनी दोघींची माहिती पूर्णा पोलिसांना देऊन त्यांना ताब्यात घेण्याची सूचना केली. दरम्यान, त्यांची चौकशी करण्यात आली असता विवाहितेसोबत स्वखुशीने गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले. दोघींनी सोबत राहू देण्याची विनंतीही पोलिसांना केल्याची चर्चा आहे. पोलिसांनी जबाब नोंदवून घेत महिला व तरुणीला त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. 

"ती'चा मोबाईल होता बंद 
मुलीला सोबत नेताना विवाहितेने स्वत:चा मोबाईल बंद ठेवला होता. त्यामुळे तिचा ठावठिकाणा समजत नव्हता; परंतु एका पोलिसाने ती राहत असलेल्या भागात मोबाईल शॉपी चालकाकडे चौकशी केली असता त्यांना महिलेने काही दिवसांपूर्वीच नवीन सिमकार्ड विकत घेतल्याची माहिती दिली. 

एका कॉलवरून लागला ठावठिकाणा 
नवीन सिमकार्डचा क्रमांक मिळवून पोलिसांनी त्यावरून विवाहितेला कॉल केला. नवीन क्रमांकावर ओळखीच्यानेच फोन केला असे समजून तिने बोलता बोलता पूर्णा येथे असल्याचे सांगितले. पोलिसाच्या चाणाक्षपणामुळे दोघींचा एका कॉलवरून ठावठिकाणा लागला. 

Web Title: aurangabad news crime