अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास एक वर्ष सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

औरंगाबाद - शाळेत जाणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढत लहान भावाला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकास अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सागर मंगलदास उबाळे असे त्या संशयिताचे नाव आहे. 

गारखेडा परिसरातील 14 वर्षीय मुलगी 10 फेब्रुवारीरोजी दुपारी दोन लहान भावांसोबत पायी शाळेत जाताना रिक्षाचालक सागर उबाळे याने तिचा रिक्षातून पाठलाग केला. त्या मुलीस रिक्षात बसण्याचा आग्रह केला त्यावेळी मुलीने नकार दिला. नकार दिल्यामुळे रिक्षाचालक सागरने मुलीच्या लहान भावास मारहाण केली. त्यानंतर ते तिघे घरी परत गेले आणि आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. आईने मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठले. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून सागर उबाळेविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांच्यासमोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता आर. सी. कुलकर्णी यांनी सहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. न्यायालयाने सागरला दोषी ठरवून एक वर्ष सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, दुसऱ्या कलमान्वये सहा महिने साधा कारावास, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना शिक्षा; तसेच पाच हजार रुपये दंडाची रक्कम पीडित अल्पवयीन मुलीस द्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे. 

Web Title: aurangabad news crime