औरंगाबादेत भरचौकात कंत्राटदारावर तलवारीने वार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - दाक्षिणात्य चित्रपटांत भररस्त्यात पाठलाग करून तलवारीने सपासप वार करून खुनी हल्ल्याचे प्रकार चित्रित होतात, तसे प्रकार औरंगाबाद शहरातही प्रत्यक्ष घडू लागले आहेत. एका कंत्राटदार तरुणाला दूरध्वनी करून बोलावून घेत त्याला हल्लेखोरांनी घेराव घातला. त्यानंतर तलवारीने सपासप वार केले. जीव वाचवत पळणाऱ्या कंत्राटदाराचा पाठलाग करून पुन्हा मारहाण केल्याचा थरारक प्रकार गुरुवारी (ता. 17) रात्री साडेआठच्या सुमारास घडला. 

कुलदीप ठाकूर (वय 30, रा. ज्योती प्राइड, ज्योतीनगर) असे गंभीर जखमी कंत्राटदाराचे नाव आहे. हा प्रकार आर्थिक देवाण- घेवाणीतून झाल्याचा अंदाज आहे. ठाकूर हे मूळ बीड येथील आहेत. ते औरंगाबादमध्ये कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या आप्तेष्टांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी ते व्यायामशाळेत गेले होते. त्या वेळी त्यांना दूरध्वनी आला. व्यावसायिक कामाचे कारण सांगून त्यांना चेतक घोडा चौकात बोलाविले. ठाकूर त्यांच्या दोन मित्रांसह तेथे पोचल्यावर पुन्हा त्यांना दूरध्वनी आला. त्यामुळे दोघांना सोडून ठाकूर बोलत बोलत काही अंतर समोर गेले. त्याच वेळी हल्लेखोरांनी त्यांना घेराव घातला. अंधारातच एकाने त्यांच्या डोक्‍यावर तलवारीने दोन वार केले. हल्ला झाल्याचे लक्षात येताच मित्रांनी ठाकूर यांच्या दिशेने धाव घेतली; पण हल्लेखोरांची संख्या पाहता त्यांचा टिकाव लागला नाही. जीव वाचविण्यासाठी ठाकूर पळत सुटले. त्यांना मारहाण केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. ठाकूर यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, अद्याप ते शुद्धीवर आले नाहीत. 

रक्तबंबाळ अवस्थेतच पोलिसांत धाव 
गंभीर जखमी झालेले ठाकूर यांनी हल्लेखोरांच्या घोळक्‍यातून जीव वाचवत पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत पाहून पोलिसही अवाक्‌ झाले. त्यांनी लगेच ठाकूर यांना घाटी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी हलविले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. शहरात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास एवढी मोठी घटना घडल्यानंतरही शुक्रवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणात गुन्हा नोंद झाला नव्हता. तसेच, संशयित आरोपींचाही मागमूस पोलिसांना लागला नाही. 

Web Title: aurangabad news crime