मिटमिट्यातील नागरिकांची घेतली पोलिस उपायुक्तांनी भेट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

औरंगाबाद - मिटमिटा येथे शनिवारी (ता. १०) सकाळी अकराच्या सुमारास पोलिस उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे यांनी भेट देत महिलांची विचारपूस केली. दरम्यान, दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय निरपराध नागरिकांनी पोलिसांची धास्ती घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

मिटमिटा येथे पोलिसांनी घराघरांत जाऊन निरपराध महिला-पुरुषांना अमानुषपणे  मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे धाटे यांनी घराघरांत जाऊन चौकशी केली. ज्या कुटुंबातील पुरुषांना अटक करण्यात आली होती त्या घरातील महिलांशी त्यांनी संवाद साधला. 

लाठीचार्जच्या वेळी ड्यूटीवर असलेले काही कमांडो उपायुक्तांसोबत आले होते, असे गावकऱ्यांनी सांगितले. आमदार सुभाष झांबड यांनीही घटनास्थळाला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. त्यानी हा प्रश्‍न विधानपरिषदेत मांडणार असल्याचे नागरिकांना आश्‍वासन दिले. या वेळी स्थानिकांसह पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, नगरसेवक रावण आम्ले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: aurangabad news crime Deputy Commissioner of Police