बंदिस्त घरात मुलीची वेणी कापली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - उत्तर प्रदेशात वेणी कापण्याच्या प्रकाराने खळबळ सुरू असतानाच आता औरंगाबादेत 14 वर्षांच्या मुलीची वेणी कापल्याची घटना जहांगीर कॉलनीत सोमवारी (ता. 21) रात्री अकराच्या सुमारास घडली. हा सारा प्रकार बंदिस्त घरात झाला. रात्री कुटुंबीय जागी असूनही झोपलेल्या मुलीची वेणी कापली गेल्याने चर्चा सुरू झाली आहे. 

संबंधित मुलगी दहावीत शिकत आहे. मुलीचा चुलत भाऊ टीव्ही पाहत होता. ती खोलीत झोपली होती. त्यादरम्यान कामावरून आलेले मुलीचे वडील दुसऱ्या खोलीत पत्नीशी चर्चा करीत होते. यानंतर रात्री अकराच्या सुमारास मुलीची वेणी कापल्याची बाब आई-वडिलांच्या निदर्शनास आली. वेदांतनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कुटुंबीयांची चौकशी केली. घरात सर्व जागी असतानाही वेणी कापल्याच्या प्रकार घरातूनच घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. 

आठवड्यातील तिसरी घटना 
सातारा परिसरातही एका महिलेची वेणी कापल्याचा प्रकार रविवारी (ता.20) सकाळी उघड झाला. महिलेने सांगितले, सकाळी झोपेतून उठल्यानंतर केस कापलेले दिसले; पण याबाबत आपण कोणतीही तक्रार दिलेली नाही. या शिवाय छावणी बाजारातही पाच दिवसांपूर्वी एका महिलेची वेणी कापली गेली होती. पर्स चोरी करताना चोरांकडून ती कापली गेली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: aurangabad news crime girl

टॅग्स