तरुण चार्ली पोलिसाने घेतले जाळून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

औरंगाबाद - मयूर पार्क परिसरातील पार्वती हौसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या पंचवीसवर्षीय चार्ली पोलिसाने जाळून घेतल्याची घटना सोमवारी (ता. १२) घडली. अनिल अशोक घुले (वय २५) असे या चार्ली पोलिसाचे नाव आहे. 

प्रत्यक्षदर्शी सतीश सुधाकर दौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल घुले हे चार्ली पोलिस असून ते आईसोबत पार्वती अपार्टमेंट येथे राहत होते. दौड सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास परिसरात नित्यनियमाने गेले होते. त्या वेळी अनिल घुले हे पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर पडले. आरडाओरड झाल्याने परिसरातील नागरिक जमले. नागरिकांनी ब्लॅंकेट टाकून अनिलला लागलेली आग विझविली. 

भाजलेला अनिल ‘मी चार्ली पोलिस आहे, माझ्या मित्रांना लवकर बोलवा’ अशी विनवणी करीत होता. नागरिकांनी १०८ ची रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने शेख फईम यांनी खासगी वाहनाच्या मदतीने अनिल घुले यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी ९५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भाजले असल्याचे पोलिसांना कळविले आहे. सध्या अनिलवर घाटीत वॉर्ड क्रमांक २२ मध्ये उपचार सुरू आहेत. 

पोलिसालाही मिळाली नाही  १००, १०८ ची मदत 
अनिल घुले भाजल्याने त्यांना मदतीसाठी नागरिकांनी १०८ रुग्णावाहिका व १०० नंबरवर सात ते आठ वेळ कॉल केले. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी दौड यांनी दिली. पोलिसालाही शासकीय मदत उपलब्ध होऊ न शकल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, पोलिस उपायुक्त दीपाली धाटे व विनायक ढाकणे, पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी अनिलची ‘घाटी’त भेट घेत डॉक्‍टरांशी चर्चा केली.

लग्नाला होता नकार 
चार महिन्यांपूर्वी अनिलचा साखरपुडा झाला होता. एक एप्रिलला त्याचे लग्न होते. या लग्नाला अनिलचा विरोध होता. त्यावरून वाद सुरू होते. मुलीकडून लग्न तोडण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी होती. त्याचा ताण घेऊन अनिलने हे पाऊल उचलल्याचा आरोप भाऊ शुभम घुले यांनी केला आहे. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

Web Title: aurangabad news crime marathwada