खातेदारांना १९ लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

औरंगाबाद - तीन पिग्मी एजंटांमार्फत पैसे जमा करून सुमारे एक हजार खातेदारांचे १९ लाख रुपये बुडवल्याचा प्रकार समोर आला. यानंतर संचालकाने पतपेढीचा गाशा गुंडाळून पैसे देण्यास असमर्थता दर्शविली. फसवणूक केल्याप्रकरणी संचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून सिडको पोलिसांनी त्याला रविवारी (ता. ११) अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिगंबर परसराम भोसले असे संशयित आरोपीचे नाव आहे. फसवणूक प्रकरणात दत्ता रंगनाथ पळसकर (वय ३१, रा. मु. पो. पळशी शहर, ता. जि. औरंगाबाद) या पिग्मी प्रतिनिधीने तक्रार दिली. भोसले याची हडको एन-नऊ, श्रीकृष्णनगर येथे गणपती अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी आहे. 

या सोसायटीत सुमारे एक हजार खातेदार आहेत. दत्ता पळसकर व अन्य दोघे येथे पिग्मी प्रतिनिधी म्हणून काम करतात. सोसायटीचे सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. त्यासोबतच खातेदारांकडून दररोज पिग्मी प्रतिनिधी शंभर ते एक हजार रुपये जमा करीत होते; परंतु संचालकांकडून २ फेब्रुवारी २०१८ पासून पतसंस्था बंद ठेवण्यात आली.

 पतसंस्था बंद असल्याचे पाहून पिग्मी प्रतिनिधींना संशय आला. त्यांनी पतसंस्था बंद ठेवण्याचे कारण संचालक भोसले याला विचारले. त्यावेळी पिग्मी वसुली बंद करावी, असे भोसलेकडून पळसकर व अन्य दोघांना सांगण्यात आले. त्यानंतर पिग्मी वसुली बंद करण्यात आली. दरम्यान, पिग्मी वसुलीसाठी प्रतिनिधी येत नसल्याने काही खातेदारांनी याबाबत विचारणा केली असता सारा प्रकार समोर आला. खातेदारांकडून वारंवार पैशांची विचारणा होत असल्याने पळसकर यांनी खातेदारांच्या पैशांबाबत भोसले याला वारंवार फोनवरून विचारणा केली. खातेदारांना पैसे दिले जाणार नाहीत, असे भोसले याच्याकडून सांगण्यात आले. फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पळसकर यांनी सिडको ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, संशयित संचालकाविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणात पोलिसांनी संशयिताला अटक केली.

Web Title: aurangabad news crime Pigmy agent

टॅग्स