हरणाची शिकार करणाऱ्या भावंडांना सोमवारपर्यंत कोठडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

औरंगाबाद - नारेगावातील घराच्या मोरीमध्ये गर्भवती हरिणीची व तिच्या पोटातील पाडसाची कत्तल करणाऱ्या संशयित दोघा भावांना सोमवारपर्यंत (ता. १२) पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी दिले.

औरंगाबाद - नारेगावातील घराच्या मोरीमध्ये गर्भवती हरिणीची व तिच्या पोटातील पाडसाची कत्तल करणाऱ्या संशयित दोघा भावांना सोमवारपर्यंत (ता. १२) पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी दिले.

या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सीताराम भगवंता केदारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नारेगावातील चाँदभाई (रा. नारेगाव) याच्या घरात हरिणीची कत्तल केली जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून आठ मार्चला सकाळी छापा मारला. त्या वेळी घरातील मोरीमध्ये हरिणीची व तिच्या पाडसाची कत्तल केल्याचे दिसून आले. या प्रकरणी संशयित आरोपी शेख आसिफ शेख चाँद व शेख साजीद शेख चाँद (दोघे रा. माणिकनगर, गल्ली क्रमांक आठ, नारेगाव) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव अधिनियमानुसार एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. त्यांना शुक्रवारी (ता. नऊ) न्यायालयात हजर करण्यात आले असता संशयित आरोपींनी शिकारीसाठी काही साधनांचा वापर केला का, आरोपींनी यापूर्वी काही वन्य प्राण्यांची शिकार केली आहे का, आरोपी कोणाला मांसविक्री करणार होते व आतापर्यंत त्यांनी कोणाला मांस विक्री केली आहे का आणि आरोपींचे कोणी साथीदार आहेत का, आदी बाबींचा तपास करणे बाकी असल्यामुळे आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील एस. डी. वरपे यांनी न्यायालयात करण्यात आली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: aurangabad news crime police custody