एकुलते एक सिटी स्कॅन पडले बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) गत एक महिन्यापासून एकाच सिटी स्कॅन यंत्राद्वारे तपासणी सुरू होती. यामुळे रुग्णांची परवड झाली; मात्र मंगळवारी (ता. 26) हेही यंत्र बंद पडल्याने दिवसभरात रुग्णांच्या अडचणीत भर पडली. सायंकाळी सिटी स्कॅन यंत्र दुरुस्त झाले. एकाच यंत्रावर भार असल्याने रुग्णांना वेटिंगवर राहावे लागत असून, त्यांचे हाल सुरू आहेत. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. अचूक निदानासाठी महत्त्वाच्या चाचण्या आवश्‍यक असतात. यातच सिटी स्कॅनचे तंत्र निदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हृदयरोग, अपघातात गंभीर जखमी, अर्धांगवायूसारखा आजार असलेले सुमारे चाळीस ते पन्नास रुग्ण सिटी स्कॅनसाठी "घाटी'त येतात. साधारण: एका यंत्रावर 10 ते 12 सिटी स्कॅनद्वारे तपासणी होते; मात्र रुग्णांची मोठी संख्या व तोकडी सिटी स्कॅन यंत्रे ही "घाटी'ची गंभीर समस्या आहे. केवळ दोन सिटी स्कॅन यंत्रांवर रुग्णांच्या तपासण्या केल्या जातात. यातील एक यंत्र ट्यूब उडाल्याने नादुरुस्त आहे. त्यामुळे गत महिन्यांपासून एका यंत्रावरच तपासणी सुरू होती. यामुळे रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे; परंतु एकाच यंत्रावर भार आल्याने मंगळवारी सकाळी ते बंद पडले. घाटी प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर यंत्र सायंकाळी सुरू झाले, अशी माहिती "घाटी'च्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. एकाच सिटी स्कॅन यंत्रावर भार असल्याने रुग्णांना वेटिंग करावी लागण्याची चिन्हे आहेत. अन्य एका यंत्राच्या दुरुस्तीसाठी प्रशासकीय मंजुरी, निधी आणि तत्परता महत्त्वाची असून, हे यंत्र निश्‍चित कधी सुरू होईल हे अनिश्‍चितच आहे. 

रुग्ण-नातेवाइकांना फटका 
खासगी रुग्णालयात एक सिटी स्कॅनसाठी सुमारे हजार ते पंधराशे रुपये लागतात; परंतु घाटी रुग्णालयात सिटी स्कॅन तपासणीचा खर्च साधारण: चारशे रुपयांपर्यंत आहे. येथे सिटी स्कॅनसाठी एकाच यंत्रावर मदार असून, खासगी रुग्णालयांत जाण्याची वेळ रुग्णांवर येत आहे. विशेषत: खर्च सामान्य व होतकरू रुग्ण-नातेवाइकांना झेपण्याइतपत नाही. 

Web Title: aurangabad news CT scan