संपूर्ण ‘ऑरिक’ला सायकल ट्रॅकचा घेरा

आदित्य वाघमारे
मंगळवार, 16 जानेवारी 2018

औरंगाबाद - शेंद्रा येथे उभारण्यात येत असलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ‘ऑरिक’च्या सौंदर्यीकरणावर ६६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यात संपूर्ण वसाहतीला घेरणाऱ्या सायकलिंग ट्रॅकचा समावेश असून, उर्वरित तलाव आणि अन्य कामांचा समावेश आहे. 

औरंगाबाद - शेंद्रा येथे उभारण्यात येत असलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ‘ऑरिक’च्या सौंदर्यीकरणावर ६६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यात संपूर्ण वसाहतीला घेरणाऱ्या सायकलिंग ट्रॅकचा समावेश असून, उर्वरित तलाव आणि अन्य कामांचा समावेश आहे. 

‘ऑरिक’मधील पायाभूत सुविधांचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. रेल्वे ओव्हर ब्रीज, अंतर्गत रस्ते आदी कामे पूर्णत्वाकडे जात असताना आता पुढील टप्प्यातील कामे सुरू करण्यासाठी औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडतर्फे निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भागाचे सौंदर्य खुलविण्यासाठी आता लॅंडस्केपिंगचे काम ऑरिक प्रशासनाने हाती घेतले आहे. यावर ६६ कोटींची रक्कम खर्च केली जाणार असून, यातून परिसराचे सौंदर्य वाढविण्यासाठी काम केले जाणार आहे. सौंदर्यीकरणासाठी येथील रहिवाशांकरिता सायकल ट्रॅक तयार करण्यात येतो आहे. संपूर्ण परिसराला घेरणारा हा सायकल ट्रॅक व्यायामासाठी उपयुक्त ठरणार आहे. शेंद्रा येथे असलेल्या पाच नैसर्गिक तलावांचा वापर करून त्याभोवती सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. याशिवाय या तलावांना जोडणारे ओढे आणि त्याभोवतीवीची जागासुद्धा सौंदर्यीकरणासाठी वापरली जाणार आहे. तलावांभोवती ॲम्युझमेंट पार्क आणि विक्रेत्यांसाठी जागा तयार करण्यात येणार आहे. याशिवाय या तलावांमध्ये पॅंटोन असतील जे या परिसराचे सौंदर्य वाढवितील. येथे तयार करण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहांवर सौरऊर्जा निर्मिती केली जाणार आहे.   

फुटपाथ अन्‌ फर्निचर  
‘ऑरिक’मध्ये असलेल्या रस्त्यांलगत फुटपाथचे मोठे जाळे तयार केले जाणार आहे. जड वाहतुकीसाठी मोठे मार्ग उभारले जात असताना, पादचारी आणि सायंकाळी फिरणाऱ्यांचाही यात विचार करण्यात आला आहे. रस्त्यांलगत प्रशस्त फुटपाथ आणि त्यालगत बसण्यासाठी बेंच या रकमेतून बसविण्यात येणार आहेत. यासाठी विशेष डिझाईन तयार करण्यात आले असून ते या परिसराला वेगळे रूप देणार आहे. याशिवाय मोकळ्या जागेत झाडे लावण्याचे कामाचे यातून हाती घेण्यात आले आहे. 

प्रवेशद्वार उभारणार, साइनेजची निर्मिती
‘ऑरिक’च्या मुख्य प्रवेशद्वाराचे काम या ६६ कोटी रुपयांमधून हाती घेण्यात येणार आहे. हे द्वार प्रशस्त राहणार आहे. ‘ऑरिक’मध्ये येणाऱ्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी अडचणी होऊ नयेत म्हणून साइनेज लावण्यात येणार आहेत. या साइनेजद्वारे ‘ऑरिक’मधील सेक्‍टर, कंपन्यांची ठिकाणे, रहिवासी क्षेत्राची माहिती देण्यात येणार आहे.

Web Title: aurangabad news cycle track