जिल्ह्यात डेंगीसदृश आजाराचे 63 संशयित रुग्ण आढळले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - जिल्ह्यात गेल्या महिन्यात डेंगीसदृश आजाराचे 63 संशयित रुग्ण आढळले. यामध्ये तीन जणांना डेंगीची लागण झाल्याचे समोर आले. गेल्या महिन्यात डेंगीसदृश रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र असताना आरोग्य यंत्रणेने मात्र चिंताजनक परिस्थिती नसल्याचाच दावा केला आहे. 

शहरातील राजीव गांधीनगर येथील एका शाळकरी मुलीचा डेंगीसदृश आजाराने गुरुवारी (ता. 31) रात्री मृत्यू झाल्याचे समोर आले. जानेवारीपासून जुलै महिन्यापर्यंत जिल्ह्यात डेंगीचे सहा रुग्ण समोर आले होते. यामध्ये दोन ग्रामीण तर चार शहरातील रुग्णांचा समावेश होता. सात महिन्यांच्या कालावधीत सहा रुग्ण आढळले. परंतु गेल्या महिन्यात डेंगीसदृश रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या महिन्यात आढळलेल्या जिल्ह्यातील 63 संशयित रुग्णांमध्ये शहरातील महापालिका हद्दीतील 32 रुग्णांचा समावेश आहे. यात ग्रामीण भागात एक तर शहरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे समोर आले. डेंगीसदृश आजाराबरोबरच जिल्ह्यात मलेरियाचेही तीन रुग्ण आढळून आले. यात शहरातील एका तर ग्रामीण भागात दोन रुग्णांचा समावेश आहे. डेंगीसदृश आजाराने कोणाचा मृत्यू झाला, याची माहिती अजून प्राप्त झालेली नाही, असे जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news dengue