उपमहापौरांना चौथ्यांदा डावलले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

औरंगाबाद - महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंग कामाची महापौर भगवान घडामोडे यांच्या हस्ते सुरवात झाली. या वेळी उपमहापौर स्मिता घोगरे या त्यांच्या दालनात असूनही त्यांना या कार्यक्रमासाठी बोलाविण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. ‘सबका साथ आणि सबका विकास’ असे एकीकडे सांगितले जाते. मग महिला उपमहापौर असल्याने डावलले जात आहे की काय, असा प्रश्‍नही याअनुषंगाने उपस्थित झाला आहे. उपमहापौरांना डावलण्याचा हा प्रकार चौथ्यांदा घडला आहे.

जागतिक जलदिनाच्या कार्यक्रम, जागतिक महिलादिनी हिरकणी कक्षाचे उद्‌घाटन, काही दिवसांपूर्वी महापौरांच्या दालनात पावसाळीपूर्व आढावा बैठक या ठिकाणी उपमहापौरांना डावलण्यात आल्याचा प्रकार घडला आणि मंगळवारी (ता.३०) त्यांना चौथ्यांदा डावलण्यात आल्याने उपमहापौर स्मिता घोगरे यांनी नाराजी उघड केली. मौलाना आझाद शिक्षण संस्थेतर्फे महापालिकेच्या मुख्य इमारतीचे रेन वॉटर हार्वेस्टिंग करून देण्याची तयारी दर्शविली. या कामाला मंगळवारी सुरवात झाली. महापौरांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. जेव्हा दालनात बसलेल्या उपमहापौरांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहेमद यांना विचारणा केली असता त्यांनी प्रभारी शहर अभियंता सिकंदरअली यांच्याकडून निमंत्रण देण्यात आल्याचे सांगितले. यावर सिकंदरअली यांना विचारणा केली तर त्यांनी हे काम जनसंपर्क अधिकाऱ्याचे असल्याचे उत्तर दिल्याचे उपमहापौरांनी माध्यमांना सांगितले. या प्रकारामागे मित्रपक्षाचा डाव आहे की अधिकाऱ्यांची चूक असे विचारले असता त्यांनी ही अधिकाऱ्यांची चूक असल्याचे स्पष्ट केले. यानंतर त्यांनी महापौरांच्या लक्षात ही चूक आणून दिली. यापुढे असा प्रकार होऊ नये, याबाबत अधिकाऱ्यांना समज दिली जाईल, असे महापौर घडामोडे यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news Deputy Mayor Rain water Harvesting