राष्ट्रवादीने राज्याचे वैभव म्हणून पुढे यावे: धनंजय मुंडे

Dhananjay Munde statement on NCP
Dhananjay Munde statement on NCP

औरंगाबाद - गेल्या तीन वर्षापासून आपण केंद्रात तर अडीच वर्षापासून राज्यात सत्तेबाहेर आहोत. आज आपल्या सर्वांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या मजबुतीसाठी गरज असल्याच्या भावना विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी येथे व्यक्‍त केल्या. तसेच आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, अथक कष्टातून पुन्हा "राष्ट्रवादी' या राज्याचे वैभव म्हणून पुढे यावे, अशी सादही घातली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या 18 व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (ता.10) हडकोतील राष्ट्रवादी भवन येथे श्री. मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर त्यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्याशी संवाद साधला. तत्पूर्वी काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. या कार्यक्रमास आमदार सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष तथा आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, आमदार विक्रम काळे, रंगनाथ काळे, काशिनाथ कोकाटे, किशोर पाटील, प्रदीप सोळंके, कदिर मौलाना, मेहराज पटेल, विजय साळवे, पांडूरंग तायडे, राजेश पवार, मनमोहनसिंग ओबेरॉय, नगरसेविका अंकिता विधाते उपस्थित होते. 

भाकर फिरवणार ! 
वर्धापनदिनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नेते अजित पवार हे रविवारी (ता.11) पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत. यानंतर निष्क्रीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बाजूला करून नव्या दमाचे आक्रमक, अभ्यासू कार्यकर्त्यांना सोबत घेत नविन कार्यकारिणी घोषित करतील, असेही संकेत मिळत आहेत. "भाकर फिरवली नाही की, करपते', या मतानुसार बदल केले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com