राहुल, महेश यांच्या स्वरमैफलीत गुंगले औरंगाबाद

संकेत कुलकर्णी
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

अभ्युदय फाऊंडेशनकच्या वतीने सलग पाचव्या वर्षी 'अभ्युदय दीपोत्सव' या स्वरमयी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे मंगळवारी (ता. 17) आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील गार्डियन डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

औरंगाबाद  : 'घेई छंद मकरंद' या आत्यंतिक लोकप्रिय ठरलेल्या नाट्यगीताने सुरू झालेली मंगळवारची (ता. 17) स्वरमयी दिवाळी पहाट तब्बल तीन तास रंगली. एकाहून एक सरस गीते आणि गायक राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या सुरांनी औरंगाबादकरांना मंत्रमुग्ध केले.

अभ्युदय फाऊंडेशनकच्या वतीने सलग पाचव्या वर्षी 'अभ्युदय दीपोत्सव' या स्वरमयी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे मंगळवारी (ता. 17) आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील गार्डियन डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी याप्रसंगी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर, सचिव दिनेश वकील, प्रसिद्ध उद्योजक नंदकिशोर कागलीवाल, स.भु.चे सहसचिव डॉ. श्रीरंग देशपांडे, उद्योजक राम भोगले, मुकुंद भोगले, सचिन मुळे, पंडित नाथराव नेरळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी गिर्यारोहक प्रा. मनीषा वाघमारे, लेह मॅरेथॉन पूर्ण केलेले नितीन घोरपडे, बुद्धिबळपटू साक्षी चितलांगे, शरीरसौष्ठवपटू गणेश दुसारिया यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

पहाटे सव्वा पाचला प्रसिद्ध सनईवादक कल्याण अपार यांच्या सुरेल सादरीकरणाने कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर श्रोत्यांनी खच्चून भरलेल्या मैदानात राहुल देशपांडे व महेश काळे या दोघांची मराठवाड्यातील पहिलीच जुगलबंदी रंगली. शीतल कोमल, अलबेला सजन आयो री या बंदीशींनी आरंभ करून पुढे तेजोनिधी लोहगोल, आधी रचिली पंढरी, मुरलीधर घनश्याम ही लोकप्रिय गीते त्यांनी रसिकांच्या उदंड प्रतिसादात सादर केली. 'हे सुरांनो चंद्र व्हा' या गाण्याने मैफल टिपेला पोहोचली. 'कानडा राजा पंढरीचा' या अभंगाने विठ्ठल-विठ्ठल च्या गजरात स्वरमयी कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: Aurangabad news diwali programme