वसतिगृहातील अस्वच्छतेने सहा भावी डॉक्‍टर आजारी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - काही दिवसांपूर्वीच अस्वच्छतेमुळे विद्यार्थी आजारी पडत असल्याची कबुली वैद्यकीय शिक्षण संचालक; तसेच लोकप्रतिनिधींच्या बैठकीत घाटी प्रशासनाने दिली होती. त्यावर उपायोजना न झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेणारे ‘घाटी’च्या वसतिगृहातील सहा विद्यार्थी व्हायरल फिवरने शुक्रवारी (ता. २५) रात्री आजारी पडले. तब्येत खालावल्यामुळे शनिवारी (ता. २६) त्यांना मेडिसीन विभागात दाखल करण्यात आले. 

गेल्या दोन दिवसांत ‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील सात ते आठ विद्यार्थ्यांना अचानक ताप, उलट्या आणि घसादुखीचा त्रास उद्‌भवला. ‘घाटी’च्या मेडिसीन विभागातील वॉर्ड क्रमांक ८ व ९ मध्ये चार विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थिनीही आजारी असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांना सहकाऱ्यांनीच उपचारासाठी दाखल केले. 

दोन दिवसांत कोणीही प्रशासकीय अधिकारी भेटायला आले नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. अस्वच्छतेमुळे विद्यार्थी आजारी पडत असल्याची कबुली वैद्यकीय शिक्षण संचालक; तसेच लोकप्रतिनिधींच्या बैठकीत घाटी प्रशासनाने दिली होती. त्याला महिना उलटला; परंतु अद्यापही विद्यार्थ्यांच्या वसतिगृह आणि परिसरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. नियमितपणे स्वच्छता होत नाही. त्यात पिण्याच्या पिण्याची असुविधा आहे. वॉटर प्युरिफायरअभावी अशुद्ध पाणी पिण्याची वेळ येत आहे. त्यामुळे आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्याविषयी प्रशासन काय उपाययोजना करते याकडे भावी डॉक्‍टरांचे लक्ष लागले आहे.

Web Title: aurangabad news doctor health hostel