‘एक विचार, एक मंच’तर्फे यंदा भरगच्च कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार दिनानिमित्त विविध आंबेडकरी पक्ष-संघटनांचे स्वतंत्र स्टेज न उभारता नामांतर शहिदांना सर्वांनी एकाच मंचावरून अभिवादन करून रिपब्लिकन चळवळीत नवे ‘संवादपर्व’ सुरू करण्यासाठी ‘एक विचार, एक मंच’चा उपक्रम तब्बल २४ संघटनांच्या पाठिंब्यातून साकारला जात आहे.

ज्येष्ठ नेते गंगाधर गाडे, आनंदराज आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, चंद्रकांत हंडोरे, भीमराव आंबेडकर, मनोज संसारे, गंगाराम इंडिसे, विवेक चव्हाण, नानासाहेब भालेराव आदी नेत्यांनी आपापले मंच बाजूला सारत तरुणांना प्रतिसाद देत एका मंचावर येण्याचे निश्‍चित केले आहे. यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा गट सहभागी नाही.

नामांतर शहीद अभिवादन मार्च
औरंगपुरा येथे महात्मा फुलेंना अभिवादन करून सकाळी नऊला सुरवात. खडकेश्वर मार्गे मिलकॉर्नर येथे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून पोलिस आयुक्तालय मार्गे-भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून-ज्युबिली पार्क येथून पाणचक्की मार्गे विद्यापीठ गेट येथील क्रांती स्तंभास अभिवादन. 

भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांचा सहभाग या रॅलीत असणार आहे. 

दुपारी १ वाजता समता सैनिक दलाचे संचलन, दुपारी २ वाजता कलावंतांचे भीमगीत सादरीकरण, दुपारी ४ ते ५ मेघानंद जाधव, प्रा. डॉ. किशोर वाघ व स्थानिक कलावंतांचा भीमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम, सायंकाळी ५.४० ला प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत क्रांती स्तंभास सलामी, डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन, सायंकाळी ६ वाजता मंचावर आगमन व सभेस सुरवात, तर रात्री १०वाजता समारोप.

Web Title: aurangabad news Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University