नामविस्तार दिनात बंदोबस्तासाठी अनुभवी अधिकाऱ्यांना पाचारण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

औरंगाबाद - कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमासाठी पोलिस प्रशासनाकडून मोठी दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी विद्यापीठ परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय नामविस्तार दिनाच्या बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शहराची माहिती असलेले व तगडा जनसंपर्क असलेले उपायुक्त वसंत परदेशी यांनादेखील बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे. 

नामविस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. विद्यापीठ परिसरात सीसीटीव्ही, पोलिस मदत केंद्र, ड्रोन कॅमेरा, स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. याशिवाय गृहखात्याच्या वतीने अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्रसिंग यांची बंदोबस्तावर नियुक्ती केली आहे. शनिवारी सायंकाळी राजेंद्रसिंग हे शहरात दाखल झाले. तसेच उपायुक्त वसंत परदेशी यांनासुद्धा पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, विविध मागण्यांसाठी भडकल गेट येथे उपोषणासाठी बसलेल्या भिक्‍खू संघाची आज वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना हेमंत कदम यांनी कलम १४९ नुसार नोटीस बजावली आहे. 

पोलिसांचे शक्तिप्रदर्शन
पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात नामविस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला शक्तिप्रदर्शन करीत पथसंचलन केले. यात राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या, तीन उपायुक्त, पाच सहायक पोलिस आयुक्त, २६ पोलिस निरीक्षक, ७५ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, एक हजार १५७ पोलिस कर्मचारी, १३४ महिला व पुरुष होमगार्ड, दामिनी पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक, विशेष पोलिस अधिकारी, क्‍युआरटी, दंगा नियंत्रण पथक, वरुण वाहन यांचा समावेश होता.

Web Title: aurangabad news Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University