महाविद्यालयीन तरुणाचा पाझर तलावात बुडून अंत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

औरंगाबाद - देवळाई, बाळापूर भागातील तलावात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. नऊ) सायंकाळी चारच्या सुमारास उघड झाली. सूरज भीमराव जेठे (वय २०, रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) असे मृताचे नाव आहे. सूरज जेठे पंडित नेहरू महाविद्यालयात शिक्षण घेत होता. नुकताच तो बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. गुरुपौर्णिमेनिमित्त व सुटीचा दिवस असल्याने तो मित्रांसोबत देवळाई-बाळापूर शिवारातील साई मंदिरात दर्शनासाठी गेला. यानंतर तो मित्रांसोबत तलावाकडे गेला. या वेळी पाण्यात पडला. तो पाण्यात पडल्याचे पाहताच मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; पण उपयोग झाला नाही.

औरंगाबाद - देवळाई, बाळापूर भागातील तलावात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. नऊ) सायंकाळी चारच्या सुमारास उघड झाली. सूरज भीमराव जेठे (वय २०, रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) असे मृताचे नाव आहे. सूरज जेठे पंडित नेहरू महाविद्यालयात शिक्षण घेत होता. नुकताच तो बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. गुरुपौर्णिमेनिमित्त व सुटीचा दिवस असल्याने तो मित्रांसोबत देवळाई-बाळापूर शिवारातील साई मंदिरात दर्शनासाठी गेला. यानंतर तो मित्रांसोबत तलावाकडे गेला. या वेळी पाण्यात पडला. तो पाण्यात पडल्याचे पाहताच मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; पण उपयोग झाला नाही. सूरज बुडाल्याची माहिती त्यांनी त्याच्या कुटुंबीयांना कळविली. दरम्यान, त्याचे नातेवाईक व पोलिस घटनास्थळी पोचले. 

रेस्क्‍यू ऑपरेशनद्वारे त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलिस ठाण्यात झाली.

Web Title: aurangabad news drawned

टॅग्स