औरंगाबाद-जळगाव या राज्य महामार्गावर रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

फुलंब्री (औरंगाबाद) : शासनाने तात्काळ पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी औरंगाबाद-जळगाव या राज्य महामार्गावर फुलंब्रीत 45 मिनिटे रस्ता रोको आंदोलन आज (शुक्रवार) करण्यात आले.

फुलंब्री (औरंगाबाद) : शासनाने तात्काळ पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी औरंगाबाद-जळगाव या राज्य महामार्गावर फुलंब्रीत 45 मिनिटे रस्ता रोको आंदोलन आज (शुक्रवार) करण्यात आले.

काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी केले. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत करा, शेतकऱ्यांच्या पाल्याची शालेय फी माफ करा आदी प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. 45 मिनिटे आंदोलन केल्यानंतर धडक मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. तहसीलदार संगीता चव्हाण यांना निवेदन देऊन भाजप सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. 'फडणवीस सरकार हाय, हाय, भाजप सरकारचे करायचे काय? खाली मुंडक वर पाय,' 'शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे,' आदी घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रसंगी माजी आमदार डॉ कल्याण काळे, जगन्नाथ काळे, संदीप बोरसे, किशोर बलांडे, बाबुराव डकले, संतोष मेटे, आबाराव सोनवणे, अंबादास गायके आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: aurangabad news drought farmer government and stop the way