ज्येष्ठ अर्थशास्त्रतज्ञ एच. एम. देसरडा पोलिसांच्या ताब्यात

वृत्तसंस्था
रविवार, 3 सप्टेंबर 2017

याबाबत पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती म्हणाले की, बार असोसिएशनच्या वतीने ठाण्यास देण्यात आलेल्या पत्रात असे स्पष्ट सांगण्यात आले होते की श्री. देसरडा या कार्यक्रमात गोंधळ घालु शकतात आणि हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असल्याने त्यांना येथे प्रवेश देण्यात येऊ नये.

औरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या 36 व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने औरंगाबादच्या जग्दगुरु संत तुकाराम नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रविवारी (ता.3) सकाळी हजेरी लावण्यासाठी गेलेले अर्थशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. एच. एम देसरडा यांना पोलिसांनी नाट्यगृहाच्या दारावरच रोखले.

याबाबत पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती म्हणाले की, बार असोसिएशनच्या वतीने ठाण्यास देण्यात आलेल्या पत्रात असे स्पष्ट सांगण्यात आले होते की श्री. देसरडा या कार्यक्रमात गोंधळ घालु शकतात आणि हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असल्याने त्यांना येथे प्रवेश देण्यात येऊ नये. त्यानुसार त्यांना रोखुन विनंती करण्यात आली, पण न ऐकल्यामुळे श्री. देसरडा यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले असल्याचे प्रजापती म्हणाले.

दरम्यान आपण कोणताही कायद्याचा भंग केलेला नसताना पोलिसांनी ठाण्यात नेण्यापुर्वी कारण स्पष्ट केले नसल्याची प्रतिक्रीया "सकाळ' ला दिली. 

Web Title: Aurangabad news economist MH Desarda arrested