औरंगाबादेत प्रोझोनमधील ज्वेलरी शॉपमध्ये "इडी'चा छापा
औरंगाबादेत प्रोझोनमधील ज्वेलरी शॉपमध्ये "इडी'चा छापा

औरंगाबादेत प्रोझोनमधील ज्वेलरी शॉपमध्ये 'इडी'चा छापा

  • निरव मोदीच्या नातेवाईकाचे दूकान
  • अकरावाजेपासून कसून झाडाझडती

औरंगाबाद : औरंगाबादेतील प्रोझोन मॉलमध्ये एका ज्वेलरीशॉपमध्ये सक्तवसूली संचनालय (इडी) ने सोमवारी (ता. 19) सकाळपासून छापा घातला आहे. सायंकाळी चारपर्यंत झडतीसत्र सूरु असून दहा ते बारा जणांचे पथक ठाण मांडून आहे. पंजाब नॅशनल बॅंकेची सूमारे अकरा हजार कोटी रुपयांची फसवणूक करणारा व्यावसायिक नीरव मोदीच्या नातलगाचे हे शॉप असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली.

पंजाब नॅशनल बॅंकेला गंडवल्याचे प्रकरण उघड होताच या प्रकरणात अधिकृत तक्रार दाखल होण्यापूर्वीच निरव मोदी याने देशातून पलायन केल्याचे उघड झाले. फसवणुकीप्रकरणी पंजाब नॅशनल बॅंकेची तक्रार 'सीबीआय'कडे 29 जानेवारी रोजी वर्ग झाली. त्यानंतर सारे प्रकरण उजेडात आले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर निरव मोदीवर सक्तवसूली संचनालयाने "लक्ष्य' घातले आहे. यानंतर "इडी'चे पथक सकाळी अकरा वाजता औरंगाबादेतील प्रोझोन मॉलमध्ये धडकले. "शॉपरस्टाप' या विक्री दालनात असलेल्या"गितांजली' ज्वेलरीच्या दूकानात या पथकाने झडतीसत्र सुरु केले. व्यवहार व काही कागदपत्रांची पडताळणी "इडी'च्या पथकाने सूरू केली. सकाळी अकरा वाजेपासून सूरू असलेले झडतीसत्र सायंकाळपर्यंत सूरूच होते. सूत्रांनी सांगितले की, ज्वेलरी खरेदी-विक्रीसह काही व्यवहाराची पडताळणी इडीच्या पथकाने केली असून ही कागदपत्रे त्यांनी जप्त केली आहेत. याबाबत ज्वेलरीच्या व्यवस्थापकाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी याबाबत उद्या माहिती देण्यात येईल असे सांगितले.

गोपनियपणे छापा..
अत्यंत गोपनिय पद्धतीने "इडी'कडून छापा घालण्यात आला. यावेळी पंधरा ते वीस मिनिटे शॉपमध्ये काय सुरु आहे. कोण व्यक्ती तपासणी करीत आहेत, याची आजूबाजूच्या शॉपचालकांना खबरही नव्हती. "सकाळ'च्या प्रतिनिधीने "इडी'च्या अधिकाऱ्यांची वार्तालाप केला, त्यावेळी त्यांनी या प्रकरणात बोलण्याचे अधिकार आपणास नसल्याचे सांगितले. वरिष्ठ सर्व कारवाईची माहिती देतील असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com