गौताळ्याने पांघरला हिरवा शालू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

चिंचोली लिंबाजी - कनड तालुक्‍यातील निसर्गरम्य गौताळा अभयारण्य श्रावण महिन्याच्या प्रारंभीच हिरवाई व मनमोहक फुलांमुळे नटला असून पर्यटकांचा ओढा वाढला आहे. अभयारण्यात प्रवाशांसह विद्यार्थी व निसर्गप्रेमी हजेरी लावून मनमुराद आनंद लुटत आहेत.

अभयारण्यातील गौतमऋषी मंदिर, सीताखोरी, सीता न्हाणी, दर्गा, पाणवठे, व्ह्यू पॉईंट या ठिकाणांना पर्यटक भेटी देऊन सेल्फी व छायाचित्रण करीत आहेत. अभयारण्यातील मोर, ससा, कोल्हे आदी प्राणीही अधूनमधून आढळत आहेत. वनविभागाने उभारलेल्या मनोऱ्यावरून दूरवर नटलेली हिरवाई डोळ्यांचे पारणे फेडत आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्‍यल्‍प अाहे. त्‍यामुळे खरिप पिकांची वाढ खुंटली आहे. भूजल पातळीतही वाढ झालेली नाही. मात्र सुरवातीला झालेल्‍या पावसाने निसर्ग फुलला आहे. 

Web Title: aurangabad news environment Gautala Sanctuary