राज्यात 7 डिसेंबरपासून शेतकऱ्यांचे जेल भरो 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद -शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी 7 डिसेंबरपासून राज्यभरात जेल भरो आंदोलन केले जाणार आहे. यासाठी दहा लाख शेतकरी शासनाच्या धोरणाविरुद्ध तुरुंगात जाण्याचे इच्छापत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील, असा निर्णय येथे रविवारी (ता. पाच) झालेल्या किसान मंचच्या राज्यस्तरीय कार्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

अध्यक्षस्थानी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे होते. धोंडगे म्हणाले, ""कर्जमुक्‍तीसह इतर मागण्यांबाबत वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे शासनाच्या धोरणाविरुद्ध सविनय कायदेभंगाच्या सनदशीर मार्गाने जेल भरो आंदोलन केले जाणार आहे,'' अशी माहिती त्यांनी दिली. या वेळी इतर शेतकरी नेत्यांनीही भूमिका मांडली. 

Web Title: aurangabad news farmer