जिल्ह्यात दीड हजार शेतकऱ्यांनी भरला विमा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - यंदा ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील १ हजार ५२६ तर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतून २ लाख ६ हजार ९३६ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. मात्र, सर्व्हर डाउन आणि इतर तांत्रिक कारणाने ज्या शेतकऱ्यांना विमा भरता आला नाही. त्यांच्यासाठी आता ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

१५ जुलैपासून पीक विमा भरणे सुरू झाल्यापासून २० ते २२ जुलैपर्यंत बहुतांश बॅंकांनी विमा भरून न घेतल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. सुरवातीला ऑनलाइन पद्धतीने भरला जाणारा विमा दोन दिवसांपूर्वी संकेतस्थळ हॅंग होत असल्याने ऑफलाइन भरून घेण्यात आला. मात्र, दुसरीकडे सोशल मीडियावरील अफवा आणि तारीख वाढेल या आशेवर शेतकरी असल्याचे जिल्ह्यात चित्र होते.

Web Title: aurangabad news farmer Insurance