कुंभेफळच्या शेतकऱ्याने केली मोत्यांची शेती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

औरंगाबाद - कुंभेफळ येथील प्रगतिशील शेतकरी अनिल गोजे यांनी शेततळ्यात गोड्या पाण्यातील शिंपले संवर्धनाचा प्रयोग केला असून, येत्या दीड वर्षात त्यातून सहा ते दहा लाखांपर्यंतचे उत्पादन अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रयोगशील शेतकरी म्हणून श्री. गोजे यांची परिसरात ओळख आहे. त्यांनी पंधरा एकर शेतीमध्ये डाळिंब, पेरू, सीताफळाची लागवड केली आहे. त्यात ज्वारी, गाजर, मेथी, कोथिंबीर, बटाट्याचे आंतरपीक घेतले जाते. त्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला जातो. तसेच शासनाच्या अनुदानातून दोन शेततळी त्यांनी घेतली आहेत. या शेततळ्यात रोहू, कटला या प्रजातींच्या माशांचे उत्पादन घेतले. त्यासोबत शिंपल्यांचे संवर्धन करून मोत्यांची शेती सुरू केली आहे. त्यातून सहा ते दहा लाखांपर्यंतचे उत्पादन मिळण्याची शक्‍यता असल्याचे श्री. गोजे यांनी सांगितले.

डिझाईनपासून ब्लॅकपर्यंत...
मोत्यांमध्ये डिझाईन मोती, राउंड मोती, मेटल उत्तक मोती, ब्लॅक मोती असे प्रकार आहेत. मोत्यांच्या शेतीतून असे विविध प्रकारचे मोती मिळणार असल्याचे श्री. गोजे यांनी सांगितले. 

Web Title: aurangabad news farmer moti agriculture