मराठवाड्यात मुलीच्या लग्नाच्या चिंतेने शेतकऱ्याने संपविले जीवन

शेखलाल शेख
शुक्रवार, 14 जुलै 2017

  • सकाळी वीस हजारांचे पीक कर्ज आले खात्यात अन्‌ रात्री घेतला गळफास
  • स्वतःच्या शेतातील निलगिरीच्या झाडाला गळफास बांधून घेतला जगाचा निरोप

औरंगाबादः मागील वर्षापासून पासून पीक कर्जासाठी बॅंकेच्या चकरा मारल्यानंतर या वर्षी वीस हजारांचे पीक कर्ज मंजुर झाले. वीस हजारांची रक्कम सकाळी खात्यात जमा झाली. मात्र, तुटपुंज्या रकमेत काय होणार, सर्व कर्ज कसे फेडणार, दुबार पेरणीचे संकट, सतत नापिकी, यंदा मुलींचे लग्न कसे करणार या चिंतेने खचलेल्या आडगाव सरक (ता. औरंगाबाद) येथील शेतकरी तातेराव दामोधर पठाडे (वय 52) यांनी गुरुवारी (ता.14) रात्री स्वतःच्या शेतातील निलगिरीच्या झाडास गळफास बांधून आपली जीवन यात्रा संपविली. शुक्रवारी त्यांचे शासकीय घाटी रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले.

तातेराव दामोधर पठाडे (वय 52) यांची आडगाव मधील पुर्व भागात 26 गुंठे जमीन आहे. आपल्या याच जमीनीत ते घर बांधून वास्तव्यास होते. त्यांना चार मुली तर 1 मुलगा आहे. मोठ्या कष्टाने, कर्ज काढून त्यांनी तीन मुलींचे लग्न केले. आता एक मुलगी बारावी वर्गात असून ती सुद्धा लग्नाला आलेली आहे. दोन ठिकाणचे स्थळ सुद्धा तीला आले होते. मात्र तातेराव पठाडे यांच्याकडे पैसेच नसल्याने त्यांची चिंता वाढली होती. 26 गुंठे जमीनीतून उत्पन्न मिळत नव्हते. कुटुंबासाठी यातून थोडेफार धान्य ते पिकवत. येथे कुटुंबाचे पालन पोषण करतांना त्यांची चांगलीच दमछाक झाली होती.
मागील वर्षी त्यांनी पीक कर्ज मिळावे यासाठी बॅंकेत खुप खेट्या मारल्या होत्या. मात्र जमीन कमी असल्याने त्यांनी पीक कर्ज मिळाले नाहीत. या वर्षी त्यांनी सर्व कागदपत्रे जमा करुन पळशी शहर येथील स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखेत पीक कर्ज मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश सुद्धा आले.

गावकऱ्यांनी सांगितले की, गुरुवारीच त्यांच्या खात्यावर वीस हजारांचे पीक कर्ज जमा झाले होते. ही रक्कम खात्यातच असतांना त्यांनी रात्री आपले जीवन संपविले. आर्थिक स्थिती बेताची असल्याने मुलीचे लग्न कसे करणार याची चिंता त्यांना सतावत होती. मागील वर्षीच त्यांनी पाहुणे, ओळखीचे व्यक्तीचे यांच्याकडून काही रक्कम हातउसनी घेऊन तिसऱ्या मुलीचे लग्न केले होते. याच चिंतेने मागील काही दिवसांपासून ते खुपच तणावात होते. गुरुवारी रात्री त्यांनी आपल्या शेतातील निळगिरीच्या झाडाला गळपास लावुन जीवन यात्रा संपविली. शुक्रवारी त्यांच्या कुटुंबियांना सकाळी त्यांचा मृतदेह झाडाला लटकेला आढलला. करमाड पोलिसांनी पंचनाम करुन शासकीय रुग्णालय घाटीत शवविच्छेदन केले.

ई सकाळवरील आणखी बातम्या : 
काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा
अडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम
बाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध
पंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत
कर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त

Web Title: aurangabad news farmer suicide in marathwada