समृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने; विरोध कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

योग्य दर दिला जात नसल्याची खंत व्यक्त करत शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे.

औरंगाबाद : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आलेली असली तरी, अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांचा याला विरोध कायम असून, या विरोधात गुरुवार (ता.10) रोजी शेतकऱ्यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून मागण्यांचे निवेदन दिले. 

समृद्धी महामार्ग हा औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून जात आहे. मात्र येथील शेतकऱ्यांनी आपल्याला योग्य दर दिला जात नसल्याची खंत व्यक्त करत आपला विरोध कायम ठेवला आहे.

तर काही शेतकऱ्यांनी या रस्त्याच्या मार्गात थोडा बदल करण्याची मागणी ही केली आहे. तसा पर्यायी प्रस्तावसुद्धा शेतकऱ्यांनी शासनाकडे पाठविला आहे. यावेळी शेतकरी नानासाहेब पळसकर, दामोधर शेळके, कालु भाई यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: aurangabad news farmers protest samruddhi mahamarg