चित्रपट रसिकांना चार दिवस दर्जेदार मेजवानी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

औरंगाबाद - पाचव्या औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला १८ जानेवारीपासून आयनॉक्‍स थिएटरमध्ये सुरवात होणार आहे. या चारदिवसीय महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या २७ चित्रपटांचे वेळापत्रक संयोजकांनी जाहीर केले आहे. 

औरंगाबाद - पाचव्या औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला १८ जानेवारीपासून आयनॉक्‍स थिएटरमध्ये सुरवात होणार आहे. या चारदिवसीय महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या २७ चित्रपटांचे वेळापत्रक संयोजकांनी जाहीर केले आहे. 

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्यानंतर गुरुवारी (ता. १८) स्क्रीन ४ वर बहुचर्चित ‘रुख’ चित्रपट दाखवला जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अतनू मुखर्जी व अभिनेत्री स्मिता तांबे यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधतील. त्यानंतर सलग तीन दिवस पाथीराकलम, मारावी, स्वयंवरम्‌ (मल्याळी), अनन्या (आसामी), ब्रेथ, नेगार, अ स्पेशल डे (इराणी), जुनून, अलीगढ, कालीघाट, सीआरडी, सिटी लाइट्‌स, समर (हिंदी), अ फ्यू अवर्स ऑफ स्प्रिंग, नाईन मंथ्स स्ट्रेच (फ्रेंच), क्षितिज, कासव, नदी वाहते, रेडू, अनाहत, सर्वनाम (मराठी), पुपा, अकालेर संधाने (बंगाली), अ वीक (श्रीलंकन), डेस्पारडे स्केवर (इस्रायली), साउंड ऑफ सायलेंस (तिबेटी), द ट्रॅम्पोलीन (क्रोएशियन) या चित्रपटांची रेलचेल असणार आहे. महोत्सवाचा समारोप कान चित्रपट महोत्सवात गाजलेल्या ‘आय डॅनियल ब्लेक’ या चित्रपटाने होणार आहे. 

महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांचे वेळापत्रक असलेला कॅटलॉग शहरात आठ ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्येष्ठांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी १५० रुपये, तर इतर नागरिकांसाठी ३०० रुपये शुल्क राहील. प्रोझोन मॉल, निर्मिक ग्रुप, विशाल ऑप्टिकल, साकेत बुक वर्ल्ड, जिजाऊ मेडिकल, महात्मा गांधी भवन, स्वाद हॉटेल, नैवेद्य हॉटेल या ठिकाणी प्रतिनिधी नोंदणी करून कॅटलॉग मिळतील, असे कळविण्यात आले आहे.

मराठवाड्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे नंदकिशोर कागलीवाल, अंकुशराव कदम, अशोक राणे, मोहम्मद अर्शद, उल्हास गवळी, सतीश कागलीवाल, सचिन मुळे, डॉ. भालचंद्र कानगो, डॉ. श्रीरंग देशपांडे, निमंत्रक नीलेश राऊत, शिवदर्शन कदम, जयप्रद देसाई, संतोष जोशी, शिव फाळके, बिजली देशमुख, डॉ. मकदूम फारुकी, डॉ. जयंत शेवतेकर, प्रा. दासू वैद्य, प्रा. मुस्तजीब खान, विजय कान्हेकर, सुनील किर्दक, सुहास तेंडुलकर, डॉ. रेखा शेळके, सुबोध जाधव, डॉ. संदीप शिसोदे, डॉ. आनंद निकाळजे, किशोर निकम, साकेत भांड, अनिलकुमार साळवे, प्रिया धारूरकर, मंगेश मर्ढेकर, गणेश घुले, मंगेश निरंतर, सचिन दाभाडे, निखिल भालेराव, मयूर देशपांडे, श्रीकांत देशपांडे, दीपक पवार, महेश अचिंतलवार, रेणुका कड आदींनी केले आहे.

Web Title: aurangabad news film festival